IMPIMP

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

by pranjalishirish
shivsena mp vinayak raut take a dig at bjp leader narayan rane over chipi airport konkan

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन: कोकणातील चिपी विमानतळावरून शिवसेना खासदार विनायक राऊत Vinayak Raut  यांनी भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांना टोला लगावला. स्वत:ला कोकणसम्राट म्हणवणाऱ्यांनी चिपी विमानतळाचे कंत्राट आयआरबी कंपनीला देऊन वाट लावली, अशा शब्दांत टीका केली. तसेच चिपी विमानतळाचे काम एमआयडीसीला दिले असते तर शिर्डी विमानतळाप्रमाणे ते काम पूर्ण झाले असते, असेही ते म्हणाले.

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

विनायक राऊत Vinayak Raut हे सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘चिपी विमानतळाचे काम एमआयडीसीला दिले असते तर शिर्डी विमानतळाप्रमाणे ते आत्तापर्यंत पूर्णही झाले असते. मात्र, नारायण राणे यांनी हे कंत्राट आयआरबीला देऊन संपूर्ण प्रकल्पाची वाट लावली. त्यांनी दळभद्री आयआरबी कंपनीचे लाड पुरवण्यासाठी चिपी विमानतळाचे कंत्राट त्यांना दिले. तसेच डीजीसीएच्या सुचनेप्रमाणे धावपट्टीचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या विमानतळाला हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नाही. आम्ही आयआरबी कंपनीला इशारा दिला आहे. काम पूर्ण झाले नाही तर एमआयडीसी चिपी विमानतळ प्रकल्पाचा ताबा घेईल.

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

दरम्यान, चिपी विमानतळाचे काम लवकर पूर्ण झाले नाही तर या प्रकल्पाचा ताबा एमआयडीसी घेईल. मात्र, विमानतळाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही विनायक राऊत Vinayak Raut  यांनी स्पष्ट केले. नारायण राणेंच्या कारकिर्दीत चिपी विमानतळाचे काम केवळ 14 टक्के झाले होते. मात्र, आम्ही ते काम शंभर टक्के पूर्ण केले, असेही ते म्हणाले.

Read More : 

शिवसेनेकडून डॉ. हर्षवर्धन, जावडेकर अन् महाराष्ट्र भाजपचा समाचार, म्हणाले – ‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडेंच्या भाषेत…’

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’

रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी, खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्य सरकारकडे मागणी

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

..अन्यथा ‘मराठवाडी’ च्या जलाशयात सत्याग्रह – नरेंद्र पाटील

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

Related Posts