IMPIMP

Sindhudurg District Bank Election | ‘ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जनतेने जिल्हा बँक दिली’, नारायण राणे यांचा महाविकास आघाडीवर घणाघात

by nagesh
Narayan Rane | the three party government will collapse in june predicted by narayan rane in washim

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइनसिंधुदुर्गच्या जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) आज भाजप (BJP) पुरस्कृत पॅनलने 19 पैकी 11 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या मेहनतीला यश मिळालं असून या विजयाचं श्रेय जनता, भाजपचे कार्यकर्ते यांना जातं अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली. तसेच ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक लोकांनी दिली आहे. ही माझी नाही तर भाजपची सत्ता असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. (Sindhudurg District Bank Election)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

भाजप नेते राजन तेली (BJP Leader Rajan Teli) यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, दिल्लीपर्यंत सत्ता आमची आहे, त्यामुळे जिल्हा बँकेत पराभव झालेल्या राजन तेलींची वर्णी लावू असं आश्वासन राणे यांनी दिली. तसेच सिंधुदुर्गच्या निवडणुकीनंतर आता राज्यात भाजपची सत्ता आणणार असल्याचं सांगत राज्यात भाजपची सत्ता हवीय, ‘लगान’ची (Lagaan) नको असा टोला महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) लगावला. (Sindhudurg District Bank Election)

 

 

बारामतीला बँकेतून कर्ज मिळणार नाही

मुख्यमंत्र्यांवर (CM) निशाणा साधताना राणे म्हणाले, राज्याला मुख्यमंत्री नसून, राज्य अधोगतीच्या मार्गावर असल्याचंही त्यांनी म्हटले. तसेच राज्याला आता भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे असल्याचे सांगितले. जिल्हा बँक ही स्थानिक शेतकऱ्यांसाठी असून, त्यांच्यासाठीच काम केलं जाईल. तसेच बारामतीसाठी (Baramati) आता या बँकेतून कर्ज दिलं जाणार नाही. बँकेच्या निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले तरी ते जिंकू शकले नाहीत, ज्यांचे चेहरे सुद्धा पाहावत नाहीत, त्यांना लोक संधी देणार नसल्याचे राणे यांनी म्हटले.

 

 

36 मंत मिळवू शकत नाही अन्..

त्यांनी कुठली धनलक्ष्मी वाटली ?  त्यांनी बँकेचे किंवा भ्रष्टाचाराचे मिळवलेले पैसे असतील. त्यामुळे त्याचं काही गेलं नाही. जे काही गेलं ते बँकेचं गेलं. त्यांची अवकात नाही. 36 मतं मिळवू शकत नाहीत आणि विधानसभेच्या गोष्टी करत करतात, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Sindhudurg District Bank Election | sindhudurg district bank election narayan rane slams mahavikas aghadi and shivsena

 

हे देखील वाचा :

Sindhudurg District Bank Election Result | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक; राणे समर्थकांचा महाविकास आघाडीला दणका

GST कौन्सिलच्या बैठकीत मोठा निर्णय ! टेक्सटाईलवर 5 टक्केच लागणार जीएसटी : सूत्र

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या आत्म्हत्येचं कारण आलं समोर

 

Related Posts