IMPIMP

GST कौन्सिलच्या बैठकीत मोठा निर्णय ! टेक्सटाईलवर 5 टक्केच लागणार जीएसटी : सूत्र

by nagesh
GST | taxpayers with turnover more than 2 crore file gstr 9 gstr 9c before 31 december

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  GST | सूत्रांनुसार जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत (GST Council 46th Meeting) टेक्सटाईलवर 5 टक्केच जीएसटी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अगोदर सरकारकडून टेक्सटाईलवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (GST)

सध्या टेक्सटाईलवर 5 टक्के जीएसटी लावला जात आहे. सूत्रांनुसार, जीएसटीमध्ये कोणत्याही प्रकारच्या बदलांबाबत सर्व राज्यांची सहमती आहे. एक जानेवारी 2022 पासून केंद्र सरकारने नैसर्गिक फायबर उत्पादनांवरील कर 5 टक्केवरून वाढवून 12 टक्के करण्यासाठी अधिसूचित केले होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

करातील वाढीला झाला होता विरोध

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सल्लागार अमित मित्रा यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते की, जर टॅक्स मागे घेतला नाही तर 15 लाख लोकांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता आहे. त्यांनी म्हटले होते की, यामुळे याच्याशी संबंधीत इंडस्ट्रीचे लोक सुद्धा प्रभावित होतील. आणि एक लाख छोटी युनिट बंद होऊ शकतात. (GST)

 

त्यांनी म्हटले होते की, अनेक युनिट असंघटित क्षेत्रात परत येतील. त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केला होता की, करात वाढ करण्यापूर्वी जीएसटी परिषदेत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली नव्हती. मात्र, अजूनपर्यंत टेक्सटाईलवर जीएसटी रोल बॅक करण्याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

 

80 लाखापेक्षा जास्त व्यापारी यांच्याशी संबंधीत आहेत. जीएसटी कौन्सिलमध्ये राज्यांचे प्रतिनिधीच असल्याने 5 राज्यांतील निवडणुका पाहता हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : GST | gst council 46th meeting gst will be levied only 5 percent on textiles sources 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या आत्म्हत्येचं कारण आलं समोर

MLA Nitesh Rane | नितेश राणेंची माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस; मुंबईतील चर्चगेट स्थानकाबाहेर लावले बॅनर

Pune Police | धक्कादायक ! पुणे पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

TET Exam Scam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपेच्या चालकाला पुणे पोलिसांकडून अटक, धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

Corporator Archana Tushar Patil | प्रभागात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरु करा; भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांची मागणी

 

Related Posts