IMPIMP

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाही घेतली ‘कोरोना’ लस !

by sikandershaikh
Uddhav Thackeray

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)1 मार्च पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या (COVID-19 Vaccinations) दुसऱ्या टप्प्याला देशात सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही कोरोना लसीचा (Coronavirus Vaccine) पहिला डोस घेतला. सोमवार दि 1 मार्च रोजी सकाळी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी कोरोना लस घेतली. यानंतर त्यांनी जनतेलाही कोरोना लस घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही कोरोना लस घेतली. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik), बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनीही लस घेतली. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्ध ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मात्र कोरोना लस घेण्याचं टाळलं. यामुळं चर्चा सुरू झाली होती. परंतु त्यांनी असं का केलं याचं कारण आता समोर आलं आहे.

देशभरात कोरोना लसीकरण केलं जात आहे. असं असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) मात्र लस घेण्यास नकार दिला असं बोललं जात होतं. परंतु आता याचं कारण समोर आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कोरोनाची लस न घेण्याबाबत म्हणाले, अधिवेशन संपल्यांतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस घेईन.
हृदयावर शस्त्रक्रिया झाली असल्यानं डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस घेईन असं ते म्हणाल्याची माहिती समोर आली आहे.

रामनाथ कोविंद यांनी दिल्लीतील आर्मी आर अँड आर रुग्णालयात कोरोनाची लस घेतली.
यावेळी त्यांची कन्याही त्यांच्या सोबत रुग्णालयात हजर होती.
त्यांचा लस घेतानाचा फोटोही समोर आला आहे.

Pooja Chavan Suicide Case : CM उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांची ‘ती’ विनंती फेटाळली, अखेर दणका दिलाच

Related Posts