IMPIMP

Nana Patole : ‘…तर सरकारनं देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी’

by pranjalishirish
Nana Patole | devendra fadnavis should explain why savarkar was getting pension from the british nana patoles challenge

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या लेटरबॉम्बमुळं राज्यासह दिल्लीतही वातावरण तापल्याचं पहायला मिळालं. या लेटरबॉम्बनंतर विरोधकांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. लेटरबॉम्ब आणि फोन टॅपिंग प्रकरणासह अनेक मुद्द्यांवर भाष्य करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. वेळ पडली तर सरकारनं देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी असं नाना पटोले म्हणाले आहेत.

PM नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

‘वेळ पडली तर सरकारनं देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी’

नाना पटोले Nana Patole  म्हणाले, महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून राज्यातील नेते सैरभैर झाले आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहे. सीडीआरबद्दलही ते विधानसभेत खोटं बोलले आहेत. ते सातत्यानं खोटं बोलत असतात. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राविरोधात कुभांड रचत आहेत. वेळ पडली तर सरकारनं देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी असं म्हणत पटेले यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला आहे.

बदल्यांचे रॅकेट, फोन टॅपिंगवर अजित पवार म्हणाले, ‘त्या बदल्या…’

‘रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे अधिकार होते का याची चौकशी केली जाणार’

पुढं बोलताना नाना पटोले Nana Patole म्हणाले, रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे अधिकार होते का याची चौकशी केली जाणार आहे. काही अधिकारी केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये त्यांनी जनतेची कामं केली पाहिजे. सरकार येतं आणि जातं. परंतु महाराष्ट्राला बदनाम करू नका. बॉलिवूड स्टार सुशांत सिंह प्रकरणातही भाजपनं केंद्रीय तपास यंत्रणांना आणि माध्यमांना हाताशी धरून 4 महिने महाराष्ट्राला बदनाम केलं. महाराष्ट्र खुनी राज्य असल्याचं चित्र निर्माण केलं गेलं.

Jitendra Awhad : ‘रश्मी शुक्लांचे अपक्ष आमदारांना भाजपच्या गळाला लावण्याचे प्रयत्न’

‘नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. त्यांनी राजीनामा दिला का ?’

नाना पटोले असंही म्हणाले की, आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फडणवीस तेच करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना न्यायाधीश असल्यासारखे सर्वांना क्लीन चीट देत सुटले होते. फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते. त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का ? नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. त्यांनी राजीनामा दिला का ? मग अनिल देशमुख यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काय अधिकार ? सध्याच्या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. चुकीला माफी नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

Also Read : 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

M नरेंद्र मोदींच्या बांग्लादेशी दौर्‍यावर पाकिस्तानचा सवाल, बांग्लादेश वासियांनी दिले त्यांना चोख प्रत्युत्तर

Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’

संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल

Ration Card Latest News : रेशन घेण्याबाबत जर तुम्ही सुद्धा करत असाल ‘अशी’ चूक तर व्हा सावध, होऊ शकते 5 वर्षांची जेल

‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य

Related Posts