IMPIMP

पोलिसांनी महिलांना नाचवल्याच्या घटनेवर अनिल देशमुखांनी विधानसभेत दिलं स्पष्टीकरण ! म्हणाले- ‘समितीनं दिलेल्या अहवालानुसार…’

by sikandershaikh
BJP

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)women dancing | जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर विधीमंडळात यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करत निशाणा साधला होता. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी (बुधवार, दि 3 मार्च) भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं होतं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान आता राज्याचे गृहमत्री अनिल देशमख (Anil Deshmukh) यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

‘महिलांना नाचवण्याच्या बातमीत तथ्य नाही’

अनिल देशमुख म्हणाले, जळगावच्या शासकीय वसतिगृहासंदर्भातील बातमीनंतर 6 विविध खात्याच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. त्या समितीनं घटनेची संपूर्ण चौकशी केली. जळगावमधील आशादीप शासकीय वसतिगृहात जाऊन तिथल्या महिलांना भेटून विचारपूस केली. जवळपास 41 साक्षीदरांना त्यांनी भेटून एक अहवाल दिला आहे. त्यानुसार महिलांना नाचवण्याच्या बातमीत तथ्य नाही असं देशमुख यांनी स्पष्ट केलंय.

‘जळगावात पोलिसांनी महिलांना नाचवल्याची कुठलीही घटना घडली नाही’

पुढं बोलताना अनिल देशमुख म्हणाले, 20 फेब्रुवारी रोजी त्या हॉस्टेलमध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम करावा म्हणून गाणी म्हटली, डान्स केला.
त्यावेळी एक महिला गरबा डान्स करताना तिला त्रास होऊ लागला म्हणून तिनं अंगावरील ब्लाऊजसारखा ड्रेस काढला.
त्यावेळी तिथं कुणीही पुरुष पोलीस अधिकारी नव्हता. तिथं केवळ महिला पोलीस अधिकारीच होत्या आणि एकूण 17 महिला होत्या.
रत्नमाला सोनार महिलेनं तक्रार केली आहे, परंतु तिच्या वेडसरपणाच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
त्यामुळं 6 वरिष्ठ महिलांच्या समितीनं दिलेल्या अहवालानुसार जळगावात पोलिसांनी महिलांना नाचवल्याची
कुठलीही घटना घडली नाही असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलं आहे.

West Bengal Legislative Assembly Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल शिवसेनेची मोठी घोषणा !

Related Posts