IMPIMP

‘हा’ अर्थसंकल्प म्हणजे किमान समान फसवणूक कार्यक्रम; ‘या’ भाजप नेत्याची टीका

by amol
this budget is the least equal fraud program of the people shelar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार Ajit Pawarयांनी राज्याचा अर्थसंकल्प Budget मांडला. आता त्या अर्थसंकल्पावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अजित पवार Ajit Pawarयांनी महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज विधानसभेत मांडला, यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “राजकीय किमान समान फसवणूक करून सत्तेत आलेल्या तिघाडी सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेची किमान समान फसवणूक कार्यक्रमच आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

काय म्हणाले आशिष शेलार
“आघाडी सरकारने सत्तेत येताना जी किमान समान आश्वासने दिली ती इतिहास जमा झाली आहेत. आजच्या अर्थसंकल्पात Budget दिलेल्या आश्वासन पूर्तीचा कोणताही कार्यक्रम नाही. शेतकरी, कामगार, छोटे उद्योजक असे अनेक समाज घटक कोरोनामुळे अडचणीत आले, त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची विशेष तरतूद नाही,” अशी टीका आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आली आहे.

अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प
“शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने हे सरकार विसरले आहेत. पहिल्या अधिवेशनात विधान भवनात ज्या बारा बलुतेदारांना आणून त्यांच्या सोबत फोटो काढले त्या बारा बलुतेदारांना कोविड काळात काहीच देण्यात आले नाही. आताच्या अर्थसंकल्पातसुद्धा त्यांच्या वाट्याला काहीच आले नाही. १ रुपयात आरोग्य सेवा, ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ अशी अनेक आश्वासने हवेत विरली आहेत. वीजबिलात माफी नाही, पेट्रोल-डिझेल भाव कमी करू सांगितले, त्याबद्दल कोणतीच घोषणा करण्यात आली नाही. ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा काहीच दिले नाही. सर्व अंगाने अपेक्षा भंग करणारा हा अर्थसंकल्प आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली
“मुंबईतील भाजप सरकारच्या काळातील जुन्या प्रकल्पांची नावे फक्त वाचून दाखवण्यात आली. केवळ अट्टाहासाने मुंबईकरांच्या माथी मारण्यात येणाऱ्या समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाचे ढोलमात्र जोरात वाजवण्यात आले. या अर्थसंकल्पात मुंबई महापालिकेच्या बजेटमधील प्रकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात Budget दाखवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री मुंबईकरांसाठी काहीतरी देतील अशी अपेक्षा असलेल्या मुंबईकरांच्या तोंडाला मात्र पाने पुसण्यात आली,” असा आरोप आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आला आहे.

अर्थसंकल्प 2021-22 : जागतिक महिलादिनी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’; महिलेच्या नावावर घर घेतल्यास…
शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन ! नाणारबद्दल म्हणाले…
महिलांना ५० % आरक्षण दिलं पाहिजे; ‘या’ महिला खासदाराची राज्यसभेत मागणी
महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा ? राज ठाकरेंची ‘ही’ पोस्ट व्हायरल
मराठा आरक्षणात अन्य राज्यांनाही पक्षकार करणार !

Related Posts