IMPIMP

ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम ?

by bali123
independent development corporation konkan demands bjp leader pravin darekar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याच मुद्यावरून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं असताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( pravin darekar ) यांनी कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.

कोकणाला संपूर्ण महाराष्ट्र विकास महामंडळातून वगळून कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे. कोकणाने आतापर्यंत भरभरून दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाचे आहेत. शिवसेनेलादेखील कोकणाने खूप काही दिले आहे. आता कोकणाची परतफेड करण्याची वेळ आली असून, ठाकरे सरकारने कोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

हे पुतना मावशीचे प्रेम
कोकणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. कोकणासाठी काही मिळाले नाही, तर ठाकरे सरकारचे कोकणासाठीचे हे पुतना मावशीचे प्रेम म्हणावे लागेल, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. शिवसेना मुंबई आणि कोकणापुरतीच असल्याचा दावा दरेकर pravin darekar यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका बदलावी
नाणार प्रकल्पावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, नाणारमुळे कोकणाचा मोठा विकास होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पात आडकाठी आणू नये.
मोठा रोजगार निर्माण होणार असेल, तर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राचे स्वागत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

Related Posts