IMPIMP

Vikram Gokhale | विक्रम गोखलेंनी व्यक्त केली खंत; म्हणाले – ‘शिवसेना, भाजपनं एकत्र यावं हीच इच्छा, पण…’

by nagesh
Vikram Gokhale Health Update | vikram gokhale is showing steady and slow recovery says shirish yatgikar pro dinanath mangeshkar hospital pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Vikram Gokhale | मागील काही दिवसांपुर्वी एका कार्यक्रमादरम्यान अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी शिवसेना आणि भाजपने एकत्र यायला पाहिजे असं भाष्य केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा गोखले यांनी शिवसेना (Shiv Sena), भाजपनं (BJP) एकत्र यायला हवं ही इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेना, भाजपनं एकत्र यायला हवं. ती काळाची गरज आहे. पण हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास काय होईल याची भीती स्युडो सेक्युलर लोकांना वाटते, असं स्पष्टीकरण गोखले यांनी दिलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणाले, शिवसेना, भाजपमध्ये फार मोठी माणसं होऊन गेली. त्यांची भाषणं ऐकत मी मोठा झालो. माझे काही नातेवाईक या पक्षांत होते, अजूनही आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांकडून काही चुका झाल्या. मात्र, या दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं असं मला आजही वाटतं. तशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. सर्वसामान्य माणूस केवळ इच्छा व्यक्त करू शकतो. त्यापलीकडे जाऊन तो काहीही करू शकत नाही. कारण मतपेटीचं राजकारण वेगळंच असतं. असं ते म्हणाले.

पुढे विक्रम गोखले म्हणाले, दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना, भाजपनं युतीची घोषणा केली. तेव्हा लहान भाऊ, मोठा भाऊ सुरू होतं. एक ध्येय समोर ठेवून, त्यासाठी प्रेरित होऊन काम करणाऱ्या या दोन्ही पक्षांना मतदारांनी निवडून दिलं. मात्र, निवडणुकीनंतर अनपेक्षित घडामोडी घडल्या. त्याची कल्पना कोणीही केली नव्हती. तो एक प्रकारचा मतदारांचा विश्वासघात होता, अशी भावनाही विक्रम गोखलेंनी बोलून दाखवली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Vikram Gokhale | bjp and shiv sena should come together senior actor vikram gokhale express his wish

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | ‘आओ कुछ तूफानी करते है, कल शाम ….मी पुन्हा’… ! अमृता फडणवीस यांचं ट्विट

Gopichand Padalkar | ‘त्या’ प्रकरणात गोपीचंद पडळकरांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Gold Price Update | महाग झाले सोने, आता 28793 रुपयात मिळतेय 1 तोळा; इथं जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा आजचा नवीन दर

 

Related Posts