IMPIMP

सौरभ दादा पंतप्रधान मोदीच्या रॅलीतून करणार राजकीय इनिंगला सुरुवात 

by sikandershaikh
west bengal assembly election

कोलकाता : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (west bengal assembly election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर तेथे राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे.  भाजपने ममता बॅनर्जींचे सरकार खालसा करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तृणमूल सोडून भाजपच्या गोटात सामील होणे अजूनही सुरूच असुन आता  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली आपली राजकीय इनिंग सुरू करणार असल्याची चर्चा जोरदार चर्चा रंगू लागली आहे. सौरव गांगुली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगाल (west bengal assembly election 2021) दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, ०७ मार्चला ते एका सभेला संबोधित करणार आहेत. त्यावेळी मोदींची रॅली निघणार असून त्यामध्येच गांगुली सहभागी होणार असल्याचे समजते.
त्यामुळे ते भाजपमधून आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात करणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.
मात्र, या वृत्ताला सौरव गांगुली आणि भाजपकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

याबाबत बोलताना  भाजप प्रवक्ते शामिक भट्टाचार्य म्हणले की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत सहभागी होण्याचा निर्णय हा सर्वस्वी सौरव गांगुली यांच्यावर अवलंबून आहे.
सध्या गांगुली हे निवासस्थानी आराम करत आहेत, याची आम्हाला कल्पना आहे.
जर त्यांची प्रकृती आणि स्वास्थ्य उत्तम असेल, तर ते यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात.
त्यांच्याकडून सकरात्मक प्रतिसाद मिळाल्यास त्यांचे स्वागतच आहे.

दरम्यान, जानेवारीत  सौरव गांगुली यांचा हृदयविकाराचा झटका आला होता.
यानंतर त्यांची अँजियोप्लास्टी करण्यात आली होती.
मात्र, त्रास जाणवू लागल्याने सौरव गांगुली यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांना रुग्णालयातून ३१ जानेवारी रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. सध्या ते घरीच आराम करत आहेत.

Related Posts