IMPIMP

Photos : मॉडेलिंगनंतर सिल्व्हर स्क्रीनवर जलवा अन् आता राजकारणात Entry ! कोण आहे भाजपमध्ये प्रवेश करणारी पायल सरकार ?

by sikandershaikh
West Bengal Assembly Election | west-bengal-elections-actor-payel-sarkar-joins-bjp-kolkata-president-jp-nadda-also-present

कोलकाता : वृत्तसंस्थापश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Legislative Assembly Election 2021) सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. भाजप (Bharatiya Janata Party – BJP) कडून यंदा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना मोठं आव्हान दिलं जात आहे. विजय मिळवण्यासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावली आहे. क्रिकेटपासून तर फिल्मी जगातील अनेकांना पक्षात सामावून घेण्यात भाजपला यश आलं आहे. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्री पायल सरकार (Payel Sarkar) हिनं गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) आणि बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. कोलकात्यातील एका कार्यक्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

नेमकी कोण आहे पायल सरकार ?

पायल सरकार ही टॉलिवूड सिनेमातील ॲक्ट्रेस आहे, पायलनं अलीकडेच हेचही आणि मिर्च 3 मध्ये काम केलं आहे. तिनं मॉडेलिंगनं आपल्या करिअरला सुरूवात केली होती. नंतर तिनं बंगाली सिनेमात आपल्या ॲक्टींगची छाप पाडली. 2006 साली आलेला बिबर हा तिच्या करिअरमधील पहिला सिनेमा होता. आजवर तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. मनोरंजन क्षेत्रात धमाल केल्यानंतर आता पायल राजकीय मैदानात उतरली आहे. (West Bengal Assembly Election)

प्रसिद्ध बंगाली मासिक उनिश कुरीच्या कव्हर फोटोवर देखील पायल झळकली आहे. 2010 साली ले चक्का साठी तिला बेस्ट ॲक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला होता. 2016 साली आलेल्या जामेर राजा दिलो बोर नावाच्या सिनेमासाठी देखील तिला पुन्हा एकदा बेस्ट ॲक्ट्रेस अवॉर्ड मिळाला आहे.

 

Pooja Chavan Suicide Case : ‘मी मर्द आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाषणात कधीही म्हणू नये’

Related Posts