IMPIMP

मी कोब्रा आहे असं का म्हणाले मिथुन चक्रवर्ती? स्वत:च सांगितलं कारण

by amol
west bengal assembly elections bjp bollywood actor mithun chakraborty cobra

सरकारसत्ता ऑनलाइन – प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच यावर बोलताना मिथुन चक्रवर्ती Mithun Chakraborty यांनी आपण कोब्रा आहोत असा उल्लेख केला. या डायलॉगमुळं ते वादात सापडले. याची खूप चर्चा झाल्यानंतर त्यांनी याचा खुलासा केला आहे की, त्यांनी स्वत:ला कोब्रा साप का म्हटलं आहे.

मिथुन चक्रवर्ती Mithun Chakraborty यांनी सांगितलं की, कोरोना काळात आपण बंगळुरूत अडकलो होतो. त्याचवेळी माझ्या विडिलांचं निधन झालं. पण कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं नाही. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आपण उपस्थित नव्हतो आणि गरिबांची मदत करत होतो.

पुढं बोलताना ते म्हणाले, मी जेव्हापासून कोब्रा असल्याचं म्हटलं आहे तेव्हापासून हा डायलॉग ट्रेंडमध्ये आहे. मिथुनदानं असं का म्हटलं याचा लोक विचार करत आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की, माझ्याबद्दल बोलताना इथं मारलं तर स्मशानात मृतदेह दिसेल असं सांगितलं जायचं. पण त्या वक्तव्यावरून वाद झाला नाही. पण जेव्हा मी कोब्रा होऊन दंश देईन म्हटलं तेव्हा मात्र लगेच सुरू झाला वाद. आजकाल सर्वच नेते काही ना काही तरी बोलत असतात म्हणून मी पण एक डायलॉग वापरला, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते मिथुन ?
भाजपप्रवेशानंतर बोलताना मिथुन यांनी सिनेमातील एक संवाद बोलून दाखवला होता. ते म्हणाले होते की, आमी जोलधारो नोई, बेले बोराओ नोई, अमी एकता कोब्रा एक चोबोल एइ चोबी (घातक नसलेला साप मला समजू नका. मी कोब्रा आहे. कुणालाही एका दंशात मारू शकतो).

अर्थसंकल्प 2021-22 : जागतिक महिलादिनी सरकारचं मोठं ‘गिफ्ट’; महिलेच्या नावावर घर घेतल्यास…
शरद पवारांचा राज ठाकरेंना फोन ! नाणारबद्दल म्हणाले…
महिलांना ५० % आरक्षण दिलं पाहिजे; ‘या’ महिला खासदाराची राज्यसभेत मागणी
महिला दिन वर्षातून एकदाच का साजरा करायचा ? राज ठाकरेंची ‘ही’ पोस्ट व्हायरल
मराठा आरक्षणात अन्य राज्यांनाही पक्षकार करणार !

Maratha Reservation : ‘अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणांचं काहीही देणं-घेणं नाही’ : देवेंद्र फडणवीस

Related Posts