IMPIMP

ममता बॅनर्जींच्या TMC चा फुल्ल फॉर्म म्हणजे ‘ट्रान्सफर माय कमिशन’- PM मोदी

by pranjalishirish
west bengal election 2021 pm narendra modi told the full form of mamta banerjee party tmc at purulia rally said it means transfer my commission

पुरुलिया: पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या पुरुलिया येथील निवडणूक रॅलीला संबोधित केले आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या व्यतिरिक्त तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी यांचे टीएमसीचे फुल्ल फॉर्म सांगितले आणि ते म्हणाले की याचा अर्थ आहे ‘ट्रान्सफर माय कमिशन’

अधिकारी बनलेल्या उमेदवारांचा राज्य सरकारला सवाल, … मग नियुक्त्या का थांबल्या?

PM मोदींनी सांगितले DBT आणि TMC चा अर्थ
पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi म्हणाले,’भाजपाच्या केंद्र सरकारचे धोरण आहे-DBT म्हणजे ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’. पश्चिम बंगालमध्ये दीदी सरकारचे धोरण TMC आहे म्हणजे – ‘ट्रान्सफर माय कमिशन’. त्यांची पश्चिम बंगालमधील लोकांना सांगितले की,’तुमचा हा उत्साह, प्रत्येक सिंडिकेट, प्रत्येक टोलेबाजांचा होश उडवत आहे. दीदींना तुमच्या जनधन खात्यांमुळे भीती वाटत आहे. बंगालमध्ये करोडो जनधन खाती उघडली आहेत. तुमचा हक्क तुम्हालाच मिळेल याची शाश्वती आहे. मित्रांनो, तुमची ही गर्जना सांगत आहे की दीदींचे सरकार जाण्याचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे.’

काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल; ‘या’ नेत्याला मिळणार मंत्रिपद?

दीदींनी बंगालची परिस्थिती कशी केली आहे?
रॅलीला संबोधित करताना PM मोदी  Narendra Modi म्हणाले की ‘दीदींनी बंगालची परिस्थिती कशी केली आहे? गुन्हा आहे, गुन्हेगार आहे परंतू जेल नाहीत. येथे माफिया, घुसखोर आहेत, ते सर्व मोकळे फिरत आहेत. सिंडिकेट आहेत, स्कॅम आहे परंतू कारवाई होत नाही. ते म्हणाले, ‘काल रात्री उत्तर परगणामध्ये २४ ठिकाणाहून अधिक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. भाजप कार्यकर्त्यांना लक्ष केले आहे. ही परिस्थिती योग्य नाही. हा हिंसाचार, हा अत्याचार, हा माफियाराज यापुढे चालणार नाही.

संजय राऊत यांना भाजपचा इशारा; ‘चुकीची कामे केली तर…’

सोनार बांग्ला पुन्हा निर्माण करणार: PM मोदी
PM मोदी म्हणाले की,’आम्ही बंगालच्या लोकांना विश्वास देतो, प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांना विश्वास देतो की २ मे ला बीजेपीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक आत्याचाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. भाजपच्या सरकारमध्ये कायद्याचे राज्य पुन्हा स्थापित केले जाईल. ते पुढे म्हणाले,’आपल्या सर्वांना मिळून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांसारख्या महान व्यक्तींच्या स्वप्नातील सोनार बांग्लाची पुन्हा निर्मिती करावी लागेल. ते सोनार बांग्ला, जेथे बंगालच्या सुवर्ण अभिमानाचा समावेश असेल आणि तिथे आत्मनिर्भरतेची शक्ती असेल.’

फाटक्या जीन्स’मुळे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्यावर नेटीझन्सकडून टीकेची झोड

PM मोदींनी सोनार बांग्ला कसे असेल हे सांगितले
PM मोदी म्हणाले, सोनार बांग्ला जिथे प्रत्येक गरीब, मजूर, आदीवासी, शेतकरी सर्व सन्माननीय जीवन जगतात. ज्यात आई, बहीण सर्व सुरक्षित आणि भयमुक्त असाव्यात. जेथे खेड्यातील तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या भरपूर संधी आहेत. जेथे उद्योगांची कमतरता नाही. जेथे टोलेबाजी, कटमनी, सिंडिकेट यांसारख्या भ्रष्टाचाराला कोणतीच जागा नाही. जेथे गुन्हेगार, अपराधी, बंडखोर तुरुंगात आहेत, रस्त्यावर नाहीत. ते म्हणाले,’बंगालच्या प्रत्येक व्यक्तीला लक्षात ठेवावे लागेल. ही वेळ आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची वेळ आहे. अत्याचारी आणि जुलमी राजवटीपासून बंगालला मुक्त करण्याची वेळ आहे. आपल्या आदर्श आणि कल्पनांना पूर्ण ताकदीवर नेण्याची हीच वेळ आहे.

Sachin Vaze Case : खासदार कुमार केतकारांचा राज्यसभेत प्रश्न, म्हणाले – ‘सचिन वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन काय?’

टीएमसीचे मोजण्याचे दिवस राहिले आहेत: पंतप्रधान
PM मोदी म्हणाले की,’पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे दिवस आता मोजण्यापर्यंत राहिले आहेत आणि ही गोष्ट ममता दीदी चांगल्या प्रकारे जाणतात. यासाठी त्या म्हणत आहेत, खेला होबे. जेव्हा जनतेची सेवा करण्याचे वचन दिले जाते तेव्हा बंगालच्या विकासासाठी रात्रंदिवस एकत्र करण्याचा संकल्प केला जातो तेव्हा खेळ खेळला जात नाही, दीदी.’

पुणेकरांसाठी Good News ! 28 मार्चपासून ‘या’ 5 शहरांसाठी सुरू होणार Non-Stop विमानसेवा

पंतप्रधान म्हणाले-दीदी खेला होबे नाही विकास होबे
पंतप्रधान म्हणाले, ‘दीदी म्हणे खेलो होबे भाजप म्हणे विकास होबे, सोनार बांगला होबे.’ दीदी म्हणे खेलो होबे, बीजेपी म्हणे चाकरी होबे, विकास होबे, शिक्षा होबे, हॉस्पिटल होबे, स्कुल होबे. ते पुढे म्हणाले, १० वर्षांच्या तुष्टीकरणनंतर लोकांवर लाठी-काठ्या चालवल्यानंतर आता ममता दीदी अचानक बदलल्यासारख्या वाटत आहेत. हे हृदय परिवर्तण नाही, ही हरण्याची भीती आहे. ही बंगालच्या जनतेची नाराजी आहे. जे दीदींना सर्व करण्यास भाग पडत आहे.

Also Read :

सिंधीया यांच्या ज्या ‘जय विलास’ राजवाड्यात झाली चोरी, तिथं आहेत 400 खोल्या आणि 3500 KG चे झुंबर

Sachin Vaze Case : देवेंद्र फडणवीसांनी रात्री उशीरा घेतली PM मोदी अन् HM अमित शाह यांची भेट

Sachin Vaze Case : महाविकास आघाडीच्या एक-दोन मंत्र्यांची NIA कडून चौकशी होण्याची शक्यता

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

Related Posts