IMPIMP

‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं’ : HM अनिल देशमुख

by pranjalishirish
when-fadnavis-was-the-chief-minister-anvay-naik-case-was-suppressed-anil-deshmukh

सरकारसत्ता ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबलं, असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला. आज ते विधानसभेत बोलत होते. यावर फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलं. माझी खुशाल चौकशी करा. माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असं ते म्हणाले. यानंतर विधानसभेत खूपच गदारोळ झाला.

‘ही चौकशी झाल्यास ते अडचणीत येतील म्हणून सचिन वाझेला टारगेट केलं जातंय’

भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 2018 मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईनं सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी हे प्रकरण दाबलं. त्यानंतर हे प्रकरण या सरकारकडे आलं. अन्वय नाईक यांच्या पत्नीनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं की, माझ्या नवऱ्यानं आणि सासूनं आत्महत्या केली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी ते प्रकरण दाबलं आहे. त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी सुरू केली. ती चौकशी सचिन वाझे करत होते. सचिन वाझेंकडे ही चौकशी राहू नये, ही जर चौकशी झाली तर माजी मुख्यमंत्री अडचणीत येतील म्हणून सचिन वाझेला टारगेट केलं जातंय. त्यामुळं सचिन वाझेंना अजिबात काढायचं नाही. यांचीच चौकशी होईल म्हणून हे असं करत आहेत.

‘करा आमची चौकशी, आम्ही धमक्यांना घाबरत नाही’

यावर देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. हे भास्कर जाधव यांना माहीत नाही. भास्कर जाधव आम्हाला धमक्या द्यायच्या नाहीत. आम्ही धमक्यांना घाबरणारी लोकं नाहीत. करा आमची चौकशी, आम्ही धमक्यांना घाबरत नाही. परंतु सचिन वाझेवर कारवाई का होत नाही ? असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना केला.

‘सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे…’

यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही यावर भाष्य केलं. भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा देत ते म्हणाले, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तक्रार त्यांची पत्नी अक्षता नाईक आणी मुलगी आज्ञा नाईक यांनी दिली. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे, अन्वय नाईक प्रकरण देवेंद्र यांनी मुख्यमंत्री असताना दाबलं. आता याची आम्हाला चौकशी करायची आहे, असंही देशमुखांनी यावेळी बोलताना सांगितलं. यानंतर फडणवीसांनी या प्रकरणी चौकशीचं आव्हान दिलं. मात्र विधानसभेत यावरून गोंधळ झाला.

Also Read :

शिवसेना-राष्ट्रवादी’च्या भूमिकेवर नाना पटोले भडकले !

औरंगाबाद नामांतराबाबत मुख्यमंत्र्यांनी हात झटकले; म्हणाले…

‘सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पतीच जबाबदार’ : सुप्रीम कोर्ट

खळबळजनक ! मनसुख हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी केल्याचा संशय; फडणवीसांचा आरोप

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मिळाला ‘हा’ मोठा सन्मान, ‘आशिया पोस्ट फेम इंडिया’ कडून दखल

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Maharashtra : ‘अमित शहा खुनी है’ च्या घोषणांनी सभागृहात राडा, सत्ताधारी आणि भाजप समोरासमोर, जाणून घ्या नेमकं काय घडलं

Related Posts