IMPIMP

मनसुख हिरेन यांची हत्या करून मृतदेह खाडीत फेकून दिला…

by pranjalishirish
Mansukh Hiren was killed and his body was dumped in the creek - Devendra fadanvis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम  –  मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांची हत्या करून त्यांच्या मृतदेह खाडीत फेकून दिला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

स्कॉर्पिओ कारसोबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या इनोव्हा कारबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. इनोव्हा कारच्या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट वापरलं होतं. ही गाडी दोनदा मुंबईत येऊन घटनास्थळी दिसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या इनोव्हाचा सध्या शोध सुरू आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत आहे.

मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी एटीएसने काल पोलीस अधिकारी सचिन वाझेंना बोलावलं होतं. या गुन्ह्याची माहिती देण्यासाठी वाझे काल दुपारी एटीएसच्या अधिकाऱ्यांना भेटले. या हत्या प्रकरणात एटीएसकडून वाझेंना काही प्रश्न करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीपासून वाझे हेच करत होते.

वाझेंनीच मनसुख यांचा जबाब नोंदवला होता. मनसुख यांची गाडी चोरून संशयितांनी त्यात स्फोटक ठेवून ती कार अंबानी यांच्या घराबाहेर लावली होती. “मनसुख हिरेन यांचा मृत्यू ही धक्कादायक घटना आहे. ही आत्महत्या की, हत्या याबाबत सगळ्याच्या मनात शंका आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी योग्य चैाकशी करण्यात येईल. सरकारच्या प्रतिमेसाठी लवकरच या प्रकरणाचा तपास पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यांच्या मृत्यूचे भांडवल करू नका” असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Also Read :

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले…

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Related Posts