IMPIMP

Pune Crime | फिल्म इंडस्ट्रीमध्ये ‘काम’ देण्याच्या आमिषाने पुण्यातील 31 वर्षीय विवाहीतेवर वेळावेळी ‘लैंगिक’ अत्याचार, महिलेसह पतीला जीवे मारण्याची धमकी

by nagesh
Pune Crime | College peon arrested for molesting college girl

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Pune Crime | फिल्म इंडस्ट्रीजमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये (short films) काम देतो, असे सांगून अनेक तरूणींची लैंगिक शिकार केल्याचे प्रकरण २ वर्षापूर्वी बॉलीवूडमध्ये (bollywood casting couch incidents) चांगलेच गाजले होते. पुण्यात असा धक्कादायक प्रकार सुरु असल्याचे समोर (Pune Crime) आले आहे. शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या आमिषाने नराधमाने 31 वर्षीय विवाहीतेवर वेळावेळी बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका ३१ वर्षाच्या महिलेच्या फिर्यादीवरुन कोंढवा पोलिसांनी Kondhwa Police Station)
समीर बाळू निकम Sameer Balu Nikam (वय ३२, रा. जिजाऊ बिल्डींग, नर्‍हेगाव) याला अटक केली आहे.
हा प्रकार ऑक्टोबर २०१७ पासून १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत फिर्यादीच्या घरी आणि कोंढवा परिसरात सुरु होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर निकम (Sameer Nikam) हा यु ट्युबवर (YouTube) शॉर्ट फिल्म बनवितो. काही गाणीही त्याने बनविली आहेत.
या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी (Pune Crime) यांच्याशी ओळख वाढविली.
त्यांच्या डोळ्यासमोर फिल्म इंडस्ट्रीचे स्वप्न उभे करुन त्यात काम मिळवून देण्याचा बहाणा करुन त्यांच्याशी शारीरीक जवळीक साधली.
त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी (Pune Crime) देऊन त्यांना मारहाण करुन वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला.
पोलीस उपनिरीक्षक सचिन खेतमाळस (PSI Sachin Khetmalas) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: A 31-year-old married woman from Pune has been raped from time to time for offering work in the film industry or bollywood

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात ऑर्केस्ट्रामधील गायिकेवर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार; शारिरीक संबंधाचे फोटो-व्हिडिओ काढून धमकावत केला बलात्कार

Gold Price Update | ‘स्वस्त’ सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! 8000 रुपयांपर्यंत ‘स्वस्त’ मिळतेय सोने, ‘इथं’ जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा दर

Aspirin Side Effects | हार्ट अटॅक रोखण्याची ‘ही’ पद्धत जीवघेणी, एक्सपर्टने दिला इशारा

 

Related Posts