IMPIMP

Ajit Pawar Vs Sharad Pawar | एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारलाय : अजित पवार

by sachinsitapure

पुणे : Ajit Pawar Vs Sharad Pawar | शरद पवार हे एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या विधानाबाबत बोलावे एवढा मी मोठा नाही. एकेकाळी मी त्यांना दैवत मानत होतो. आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवारांनी अशी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तसेच बारामतीत (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरूद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) निवडणूक रिंगणात उतरल्याने पवार कुटुंबियात तणाव दिसत आहे. रोजच्या रोज आरोप-प्रत्यारोप, टीका-टीपण्णी सुरू आहे. आज अजित पवार यांनी पुन्हा अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे.

अजित पवार नाशिक मतदारसंघातील उमेदवारीच्या तिढ्याबाबत म्हणाले की, नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात आमची चर्चा सुरू आहे, तिथून योग्य तो निर्णय होईल.

तर शिरूर, बारामतीमध्ये लोकांना धमक्या दिल्या जात आहेत, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, त्या व्यक्तीच्या विधानाबाबत मला बोलायचे नाही.

Ajit Pawar On Supriya Sule | सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची विकासकामांवरून टीका, मी केलं, मी केलं, मी केलं…

Related Posts