IMPIMP

Pune Crime | फेकलेले गरम ताट 3 वर्षाच्या बाळाच्या अंगावर पडले अन्…; सिद्धार्थनगरमधील घटना

by nagesh
Pune Crime | incident of attack on a school boy by a goon in kothrud area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन–  Pune Crime | पती पत्नीच्या भांडणात पतीने जेवणाचे गरम ताट फेकले, ते झोपलेल्या ३ वर्षाच्या बाळाच्या अंगावर जाऊन पडले. त्यावरुन जाब विचारल्याने त्याने घरातील लोकांना मारहाण करुन जखमी केले. दापोडीमधील सिद्धार्थनगर (Siddharth Nagar Dapodi) येथे ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी २१ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात Khadki Police Station ( गु. रजि. नं. १०९/२२) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ऋषिकेश अरुण भिसे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश भिसे व त्याची पत्नी पल्लवी यांच्यात भांडणे झाली. या भांडणामध्ये ऋषिकेश याने पत्नीच्या अंगावर जेवणाचे गरम ताट फेकून मारले. ही ताट बाजूला झोपलेल्या ३ वर्षाच्या त्यांच्या बाळाच्या अंगावर जाऊन पडले. त्यावेळी फिर्यादी, तिचे पती व सासू यांनी ऋषिकेश याला कशाला भांडणे करतोस, बाळाकडे बघ जरा, असे सांगितले. त्याचा राग येऊन त्याने दरवाजाला लावलेली वीट उचलून फिर्यादी मानसीचे पती निखिल याच्या डोक्यात मारली. त्यांच्या मुलीच्या पायावर मारुन जखमी केले. त्यांची भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या सासूला धक्काबुक्की करुन मारहाण करुन शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक भांबड तपास करीत आहेत.

 

Web Title : Crime News In Siddharth Nagar Dapodi Khadki Police Station Pune

 

हे देखील वाचा :

Pune PMC Encroachment Drive | ठराविक व्यावसायीकांवर ‘अतिक्रमण’ कारवाई नको ! वरिष्ठांकडूनच आदेश येत असल्याने निरीक्षकांच्या डोक्याला ‘ताप’

Uniform Civil Code | समान नागरी कायदा मुस्लिम स्वीकारणार नाहीत; ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, सांगितलं कारण

Pune Municipal Corporation (PMC) | अतिक्रमण कारवाई करताना ‘पंचनामा’ करणे शक्य नाही ! पालिकेच्या गोदामात चोर्‍या होतात परंतू…

 

Related Posts