IMPIMP

Crime News | पोलिसांत तक्रार दिल्याचा घेतला अजब सुड; दोघांनी घरात घुसून महिलेसोबत केलं विकृत कृत्य

by nagesh
Pune Crime News | An incident in Pune where a minor girl was raped in the trap of love

धुळे : सरकारसत्ता ऑनलाइन Crime News | धुळे शहरातील एक अजब आणि धक्कादायक प्रकार (Crime News) समोर आला आहे. पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणातून दोंघांनी एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग (Debauchery) केला. इतकंच नाहीतर नराधम आरोपींनी स्वयंपाकघरातील चालू गॅसवर उलथणी गरम करुन पीडित महिलेच्या हाताला चटके दिलेत. त्याचबरोबर पतीसह मुलांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. ही घटना शहरातील नचबारी परिसरात घडली आहे. या प्रकरणावरुन चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात (Chalisgaon Road Police Station) एफआयआर (FIR) दाखल झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी की, काही दिवसांआधी पीडित महिलेने संबंधित आरोपींविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात (Dhule Taluka Police Station) गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पीडित महिलेने तिच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार दिली होती. याच रागातून बदला घेण्यासाठी आरोपींनी विचित्र कृत्य केलं. योगेश रामदास पिंजन (Yogesh Ramdas Pinjan) आणि जयदीप सखाराम पिंजन (Jaideep Sakharam Pinjan) (दोघे रा. सोनेवाडी) असं गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावं आहेत. संबंधित आरोपींनी पीडितेच्या घरात बळजबरीने शिरुन त्या महिलेबरोबर लज्जास्पद कृत्य केलं आहे. एका आरोपीनं पीडित महिलेचे दोन्ही हात घट्ट पकडले, तर अन्य एका आरोपीनं स्वयंपाक घरात सुरू असलेल्या गॅसजवळ पडलेली उलथणी गरम करून पीडितेला गरम चटके (Crime News) दिले.

 

दरम्यान, या घटनेनंतर पीडित महिलेनं चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात (Chalisgaon Road Police Station)
2 संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यानंतर पोलिसांनी मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Crime News | Two men enters in victims home molestation and beating her for file fir against them in dhule

 

हे देखील वाचा :

Tripura violence | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद महाराष्ट्रात; अमरावतीत 144 कलम लागू

Pimpri Corona | दिलासादायक ! सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट, पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 33 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Ajit Pawar | रोहित पवारांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी, पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्ला!

 

Related Posts