IMPIMP

Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest | डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेऊन कचऱ्यात टाकल्याची पोलीस आयुक्तांची माहिती (Video)

by sachinsitapure

पुणे: पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे (Kalyani Nagar Accident). पुणे पोलिसांनी (Pune Police) केलेल्या एका कारवाईने पुण्यात खळबळ उडाली असून, याचे धागेदौरे ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉक्टरपर्यंत पोहोचले आहेत.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील डॉ.अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुना अहवालात बदल केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल अगरवालच्या (Vishal Agarwal Builder) फोनवर डॉक्टर अजय तावरेचा कॉल केला होता. ससून रुग्णालयातील पहिलाच रिपोर्ट आरोपीने नशा न केल्याचा आल्याने या प्रकरणांमध्ये संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने पुन्हा एकदा घेत ते खबरदारीचा उपाय म्हणून औंधमधील सरकार रुग्णालयामध्ये (Aundh Govt Hospital) दिले होते.

या दोन्ही रिपोर्ट मध्ये बदल आल्याने पोलिसांनी त्यानंतर तपासाची चक्रे फिरवत ससून मधील दोघा डॉक्टरांना अटक केली आहे. या डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेतले आणि ते कचऱ्यात टाकले, त्यानंतर त्यांनी तिसऱ्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन आरोपीचे असल्याचे भासवत अहवाल दिला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Medha Patkar | सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मानहानीच्या खटल्यात दोषी; 24 वर्षे जुन्या खटल्यात दिल्लीच्या साकेत न्यायालयाचा निर्णय

Related Posts