IMPIMP

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, व्हिझ्डम् क्रिकेट क्लब संघांचा सलग तिसरा विजय ! पुनित बालनची पाच विकेटची कमिगिरी

by nagesh
Indrani Balan Foundation | The first 'Indrani Balan Winter T20 League' cricket tournament; Puneet Balan Group, Wisdom Cricket Club teams win for the third time in a row! Puneet Balan's five wicket haul

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Indrani Balan Foundation | स्पोर्ट्सफील्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने आणि व्हिझ्डम् क्रिकेट क्लब संघाने सलग तिसरा विजय मिळवून आपली घौडदौड कायम ठेवली. (Indrani Balan Foundation)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मुंढवा येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या सामन्यात कर्णधार पुनित बालन याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने वैंकिग्ज् इलेव्हन संघाचा
३१ धावांनी सहज पराभव करून आपले अपराजित्व कायम ठेवले.
पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने १८ षटकात ७ गडी गमावून १७३ धावांचे आव्हान उभे केले.
यामध्ये धनराज शिंदे याने नाबाद ५६ धावांची खेळी केली. दुसर्‍या सत्रामध्ये पुनित बालन याने १९ धावात ५ गडी बाद करून वैंकिग्ज् इलेव्हन संघाची फलंदाजी कापून काढली.
दुसर्‍या बाजुने सचिन भोसले याने १४ धावात ३ गडी बाद केले.
या दोघांमुळे वैंकिग्ज् संघाचा डाव १३.१ षटकात ८० धावांवर गडगडला. (Indrani Balan Foundation)

 

दुसर्‍या सामन्यात अक्षय खोपडे याच्या ५६ धावांच्या खेळीमुळे व्हिझ्डम् क्रिकेट क्लबने फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबचा १०९ धावांनी धुव्वा उडवून सलग तिसरा विजय नोंदविला.
व्हिझ्डम् संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १९७ धावांचे आव्हान उभे केले.
अक्षय खोपडे (५६ धावा), श्रीपाद निंबाळकर (नाबाद ४९ धावा) आणि सागर वाघमारे (२२ धावा) यांनी फलंदाजीचा भार उचलला.
चौथ्या गड्यासाठी अक्षय आणि श्रीपाद यांनी ४९ चेंडूत ९८ धावांची भागिदारी केली व संघाला १९० धावांचा टप्पा गाठून दिला.
या आव्हानाला उत्तर देताना फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबचा डाव १७.४ षटकात ८८ धावांवर आटोपला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सामन्यांचा सविस्तर निकाल :

 

१) पुनित बालन ग्रुपः १८ षटकात ७ गडी बाद १७३ धावा (धनराज शिंदे नाबाद ५६ (२५, ७ चौकार, ३ षटकार), ऋषभ राठोड ३६, सागर बिरवडे २-३१) वि.वि. वैंकिग्ज् इलेव्हनः १३.१ षटकात १० गडी बाद ८० धावा (आदित्य कदम २०, प्रणित राणे १८, पुनित बालन ५-१९, सचिन भोसले ३-१४); सामनावीरः पुनित बालन;

 

२) व्हिझ्डम् क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद १९७ धावा (अक्षय खोपडे ५६ (२४, ३ चौकार, ४ षटकार), श्रीपाद निंबाळकर नाबाद ४९ (३४, ४ चौकार, १ षटकार), सागर वाघमारे २२, प्रफुल्ल मानकर २-३६) वि.वि. फ्रेन्ड्स क्रिकेट क्लबः १७.४ षटकात १० गडी बाद ८८ धावा (सुदीप धरणगांवकर १७, आनंद जानोरकर १०, अमित खांडवे ३-२२, प्रथमेश राठोड २-९, सुभेंदू पांडे २-८); सामनावीरः अक्षय खोपडे;

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Indrani Balan Foundation | The first ‘Indrani Balan Winter T20 League’ cricket tournament; Puneet Balan Group, Wisdom Cricket Club teams win for the third time in a row! Puneet Balan’s five wicket haul

 

हे देखील वाचा :

Earn Money | नोकरी करता करता अतिशय अल्पशा भांडवलात सुरू करा ‘हे’ व्यवसाय, दरमहा होईल चांगलीच ‘कमाई’, जाणून घ्या

Mumbai NCB | मुंबई एनसीबीची नांदेडमध्ये मोठी कारवाई ! 4 कोटींचा गांजा जप्त

Amravati Violence | माजी मंत्री अनिल बोंडेंसह भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक

 

Related Posts