IMPIMP

khandala Ghat Accident | खंडाळा घाटात कार दरीत कोसळली; सुदैवाने फुटबॉलपटू ‘सुखरूप’

by nagesh
Khandala Ghat Accident | car overturned and crashed into the valley of khandala ghat saved the young man

खंडाळा : सरकारसत्ता ऑनलाइन khandala Ghat Accident | खंडाळा घाटातील शिंग्रोबा मंदिरा नजीक कार दरीत कोसळल्याची (khandala Ghat Accident) घटना गुरुवारी सायंकाळी घडली. खोपोलीमधील (khopoli) सामाजिक संस्थेच्या युवकांना कारमधील फुटबॉलपटूला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सागर सुरेश वावळे (Sagar Suresh Wawale) असं या फुटबॉलपटूच नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फुटबॉलचा नाईट सराव करण्यासाठी सागर नेहमी लोणावळा ते खोपोली जात असतो. गुरुवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे त्याच्या मारुती झेन कारमधून जात असताना शिंग्रोबा मंदिरा नजीक त्याच्या कारला पाठीमागून धडक बसल्याचा भास झाला अन क्षणार्धात कार उलटी पलटी होत दरीत कोसळली. या अपघाताची माहिती खोपोली महामार्ग पोलीस आणि येथील स्थानिक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. रात्र खूप झाली होती. पावसाच्या सारी कोसळत असल्याने कडा निसरडा झाला होता. मात्र अशा परिस्थितीत ही अपघातग्रस्तांच्या टिमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांनी दरीत उतरण्याचा निर्णय घेतला. काळोखात आवाजावर लक्ष केंद्रीत करून त्यांनी सागरचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच जखमी सागरला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. कार पलटी होऊन दरीत कोसळली यामध्ये सुदैवाने सागर जखमी झाला त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी याचाच प्रत्यय आला. दरम्यान सागरवर खोपोलीतील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Web Title : Khandala Ghat Accident | car overturned and crashed into the valley of khandala ghat saved the young man

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मैत्रिणीबरोबरचे ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ! 42 वर्षीय तरूणाला ब्लॅकमेल करणारा ‘मिथुन’ पोलिसांच्या जाळयात

Raju Shetty | राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला जाहीर इशारा, म्हणाले – ‘आता मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार’

Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर

 

Related Posts