IMPIMP

Murlidhar Mohol | सारसबागेतला आनंद काही वेगळाच…, मुरलीधर मोहोळ यांचा लहानपणीच्या आठवणींना उजाळा

by sachinsitapure

पुणे :  – Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti BjP Candidate) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यातील प्रसिद्ध सारसबागेतील गणपतीचे (Sarasbaug Ganpati) दर्शन घेऊन नागरिकांसोबत संवाद साधला. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन सारसबागेतला आनंद काही वेगेळाच असतो असे म्हणत लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. पुण्याचं वैभव, पुण्याचं संचित, पुण्याचं केंद्र आणि पुण्याच्या शिरपेचातला मानाचा तुरा म्हणजे आपली सारसबाग. सकाळीच सारसबागेत जाणं झालं. विघ्नहर्त्याचे मनोभावे दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिथं आलेल्या असंख्य मतदारांना भेटल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी पुढे म्हटले की, इथं जाणं कधीही आनंददायीच. पण लहानपणी सारसबागेत खेळण्यातला आनंद आणि आज लोकसभेचा उमेदवार म्हणून तिथं आलेल्या लोकांना भेटायला जाण्यातला आनंद, हे दोन्ही आनंद कितीतरी अर्थांनी वेगळे आहेत. तरीही सारसबाग ती सारसबागच. कधीही जा, ती सतत प्रसन्नच भासते, आनंदच देते. आज तो कैकपटींनी मिळाला आणि लोकांना भेटताना, त्यांच्याशी संवाद साधताना तो दुणावला.

यावेळी नागरिकांना महायुतीचा उमेदवार म्हणून मतदान करण्याची साद घातली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडेच पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्याची हाक दिली. त्यावर सर्वांनीच याकामी सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याचे, मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने, शिवाजीराव भागवत, राजेंद्र काकडे, राजाभाऊ शेंडगे, गणेश घोष, प्रमोद कोंढरे, प्रशांत दिवेकर, सतीश मोहोळ, श्रीकांत काकडे, सरस्वती शेंडगे, रघुनाथ गौडा, राजेंद्र शिळीमकर, हरिदास चरवड, आनंद रिठे, महेश वाबळे, अजय खेडेकर, प्रवीण चोरबेले, गायत्री खडके, स्मिता वस्ते, गणेश भोकरे, धनंजय जाधव, चिरमे, अजित गिरे, अमोल एकबोटे, जगन्नाथ लडकत, किशोर खन्ना, अमृत अवचट, गिरीश पोटफोडे, बाळासाहेब अमराळे, भोला वांजळे, प्रियांका शेडगे, जयश्री भोसले, सारिका निकम, आरती चंद्रात्रे, योगेश कुलकर्णी, गणेश चिल्लाळ, सुनंदा गुपचूप, सुनील घाडगे, सोपानराव पायगुडे, हेमंत गालिंदे, रामभाऊ एरंडे, रमेशभाई मोदी, अरुण गुजराथी, राजसिंग, उद्धव भडसाळकर, अजितभाई शहा, अनिल बेलकर उपस्थित होते.

Kalamba Central Jail | कळंबा कारागृहातील मोबाइल प्रकरण आलं अंगलट, दोन अधिकाऱ्यांसह 9 कर्मचारी बडतर्फ

Related Posts