IMPIMP

NCP Prashant Jagtap | सिरिंजच्या तुटवड्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा सत्ताधाऱ्यांवर ‘हल्लाबोल’

by nagesh
NCP Prashant Jagtap | 'Chandrakant Patil may have high expectations from Ajit Pawar instead of Municipal Corporation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  गेल्या काही काळापासून संपूर्ण जग कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना कोरोना प्रतिबंधक लसीच्या (Corona vaccine) रुपात काहीसा दिलासा आपल्याला मिळाला. जगभरातील सर्व देश जास्तीत जास्त नागरिकांना लस देऊन त्यांचे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असताना भारतातील मोदी सरकार (Modi government) मात्र नागरिकांना पुरेसा लसींचा पुरवठा करण्यास सपशेल अपयशी ठरले असल्याचे प्रशांत जगाताप (NCP Prashant Jagtap) यांनी म्हटले आहे. आधीच मोदी सरकारकडून लसींचा पुरवठा अपुरा होत असताना पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) सत्ताधारी उपलब्ध लसी देण्यासही अपयशी ठरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap) यांनी केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

लसीकरणासाठी नागरिक आटोकाट प्रयत्न करत असताना उपलब्ध असलेल्या लसी देण्यासाठी
पुणे महानगरपालिका लस टोचण्यासाठी लागणाऱ्या सिरिंग्ज (सुई) (Syringe) पुरवण्यात अपयशी ठरली आहे.
तब्बल 8,500 हजार कोटी रुपयांचे बजेट असणारी पुणे महानगरपालिका आपल्या नागरिकांना लस देण्यासाठी सध्या
सिरिंग्ज पुरवू शकत नाही ही फार मोठी शोकांतिका असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पार्टी (BJP) म्हणजे व्यवस्थेचं वाटोळं करणारी संघटना आहे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
पुणे शहरातील (Pune City) अनेक डिस्ट्रिब्युटर्स (Distributors), मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स (Manufacturing units) मधून देशभर सिरिंग्जचा पुरवठा करण्याची
क्षमता असतांना या डिस्ट्रिब्युटर्सकडे भाजपच्या नेत्यांची एवढी सुद्धा पत नाही की ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये (emergency) महापालिकेला सिरिंग्ज उपलब्ध
करून देऊ शकतील? असा प्रश्न उपस्थित करत अवघ्या 1 ते 1.50 रुपयांच्या सिरिंग्जसाठी सुद्धा राज्य सरकारवर अवलंबून असतील तर
भाजप महानगरपालिका सांभाळू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
अशा शब्दांत जगताप (NCP Prashant Jagtap) यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

 

भारतीय जनता पक्षाच्या धोरणांमुळे पुणे महानगरपालिका दिवाळखोरीत निघत असल्याने अवघ्या एक रुपयात मिळणारी सिरिंगस विकत घेण्याची पुणे महानगरपालिकेची ऐपत नसेल तर पुणेकर नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोफत सिरिंग्ज देण्यास तयार असल्याचे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

 

Web Title :  NCP Prashant Jagtap | NCP city president Prashant Jagtap launches ‘attack’ on ruling party over syringe shortage

 

हे देखील वाचा :

Maharashtra College Reopen | राज्यातील महाविद्यालये दिवाळीनंतरच सुरु करण्याचा विचार, उदय सामंत यांची माहिती

Baramati Bus Stand | बारामतीत होणार राज्यातील सर्वात अत्याधुनिक बसस्थानक

Aquila Restaurant | साडीला Smart Dress न मानणारे रेस्टॉरंट ‘Aquila’ला लागलं कुलूप, ‘या’ कारणामुळे झाली कारवाई

 

Related Posts