IMPIMP

Pimpri Chinchwad Police MCOCA Action | पिंपरी चिंचवडमधील दोन गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोक्का’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांची कारवाई

by sachinsitapure

पिंपरी : Pimpri Chinchwad Police MCOCA Action | आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी चालू वर्षात सहा संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील 30 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

भोसरी पोलीस ठाण्याच्या (Bhosari Police Station) हद्दीतील पवन उजागरे याच्यासह तीन जणांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख पवन छगन उजागरे (रा. भोसरी), सुनिल जनार्दन सकट (वय-32 रा. लांडेवाडी, भोसरी), दिपक रामकिसन हजारे (वय-27 रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. आरोपींवर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.(Pimpri Chinchwad Police MCOCA Action)

वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station) हद्दीतील आदित्य उर्फ निरंजन आहिरराव याच्यासह चार जणांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आदित्य उर्फ निरंजन शाम आहिरराव (वय-31 रा. तापकीरनगर, काळेवाडी, पुणे), प्रतिक अशोक माने (वय-20 रा. थेरगाव, पुणे), प्रेम संदीप तरडे (वय-19 रा. काळेवाडी, पुणे) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दोन्ही टोळ्यांमधील आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (IPS Vasant Pardeshi),
पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे (DCP Sandeep Doiphode), पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 बापु बांगर
(DCP Bapu Bangar), पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore), सहायक पोलीस आयुक्त
गुन्हे सतीश माने (ACP Satish Mane), सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग विशाल हिरे (ACP Vishal Hire)
यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे (PI Vitthal Salunkhe),
पी.सी.बी. गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल देवडे (PI Anil Devde), सहायक पोलीस निरीक्षक अंबरीष देशमुख
(API Ambrish Deshmukh), पोलीस उपनिरीक्षक सुहास खाडे (PSI Suhad Khade), पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटोळे
(PSI Suhas Patole), पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी यांच्या पथकाने केली.

FIR On Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांची मोठी कारवाई; 80-90 जणांवर 2 ठिकाणी गुन्हे दाखल

Related Posts