IMPIMP

PMC Property Tax | पुणे महापालिका मिळकत कराचे बिल मिळत नसलेल्या अडीच लाख मिळकतधारकांना यंदा ‘स्पीड पोस्ट’ने बील पाठवणार

by sachinsitapure
Pune Municipal Corporation

पुणे : PMC Property Tax | महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्यावतीने एक एप्रिलपासून नागरिकांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मिळकत कराची बिले पाठविण्यात येणार आहेत. बिले मिळत नसल्याने कर भरता आला नाही, अशा नागरिकांना प्रथमच स्पीड पोस्टद्वारे बिले पाठविण्यात येतील. यावर्षी १४ लाखांपैकी सुमारे अडीच लाख नागरिकांना स्पीड पोस्टद्वारे बिले पाठविण्याची व्यवसथा करण्यात आली असून संबधितांचे संपर्क क्रमांक आणि अचूक पत्ते देखिल पोस्टमन कडून नोंदविले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी दिली.(PMC Property Tax)

महापालिकेला चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २ हजार ९० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागीलवर्षी पेक्षा हे उत्पन्न ३१४ कोटी रुपयांनी अधिक आहे. समाविष्ट गावांसह शहरात सुमारे १४ लाख मिळकतींची नोंदणी झाली असून यापैकी सुमारे साडेबारा लाख मिळकती जुन्या हद्दीत आहेत. आतापर्यंत ९ लाख ५३ हजार मिळकतधारकांनी कर भरणा केला आहे. काही मिळकतधारक बिल मिळत नसल्याच्या तक्रारी करतात. अपुर्ण पत्ते, चुकीची नावे, दुबार आकारणी अशा विविध कारणास्तव थकबाकी राहाते. त्यावर दंड आकारला जावून रक्कम मोठी होत असल्यानेही नागरिक बिल भरण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी महापालिकेच्या लेखी थकबाकी दिसून येते.

यावर उपाय म्हणून महापालिकेने अशा तक्रारदारांना स्पीड पोस्टद्वारे बिल पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
स्पीडपोस्टने बील पाठविताना संबधित मिळकतधारकाचा शोध घेउन त्याचा अचूक पत्ता, संपर्क क्रमांक, ई मेल ऍड्रेस
नोंदविण्याचे कामही टपाल विभागाकडून केले जाणार आहे. यामुळे मिळकत धारकांची अपडेटेड माहिती कर विभागाकडे
येणार आहे. आगामी वर्षात अडीच लाख मिळकत धारकांना स्पीड पोस्टने बिले पाठविण्यात येणार असून प्रत्येक
बिलासाठी १२ ते १४ रुपये खर्च येणार आहे. स्थायी समितीमध्ये याला मान्यता देण्यात आली आहे.

थकबाकी वसुलीसाठी तीन हजार मिळकतींना सील

मिळकत कराची थकबाकी वसुल करण्यासाठी कर आकारणी विभागाचे प्रभारी उपायुक्त माधव जगताप यांच्या
नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणार्‍यांच्या तीन हजार मिळकती
सील करण्यात आल्याची माहिती जगताप यांनी दिली. मिळकत सील केल्यानंतर यापैकी काहींनी तातडीने थकबाकी
जमा केल्याचेही जगताप यांनी नमूद केले.

RMD Foundation | आर एम डी फाऊंडेशन उभारणार शेतकऱ्यांसाठी ‘ऍग्रीकल्चर नॉलेज हब’ – शोभाताई आर धारीवाल

Related Posts