IMPIMP

Pooja Chavan Suicide case : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून पूजा चव्हाणच्या वानवडीतील फ्लॅटची पाहणी, म्हणाल्या…

by sikandershaikh
Pooja Chavan Suicide case | chitra-wagh-visit-building-at-wanawadi-pune-where-pooja-chavan-suicide

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide case) खूप गाजत आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा समावेश असल्याचे दिसत आहे. त्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.

तसेच आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण हिने आत्महत्या (Pooja Chavan Suicide case) केलेल्या वानवडी परिसरातील इमारतीची पाहणी केली आहे. सध्या पूजा चव्हाण जिकडे राहत होती तो फ्लॅट सील करण्यात आला आहे. पूजाच्या फ्लॅटच्या वरचे ४ फ्लॅटसुद्धा बंद आहेत. चित्रा वाघ यांनी वरच्या फ्लॅटची तसेच गॅलरीतील ग्रीलची सुद्धा पाहणी केली आहे. तसेच ग्रीलची ऊंची पाहता पूजा चव्हाण स्वत: खाली पडली ? का तिला खाली ढकलले गेले ? या प्रश्नांची उत्तरे अजून अनुत्तरीत आहेत.

दरम्यान संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर चित्रा वाघ या स्वतः फ्लॅटची पाहणी केली आहे. या पाहणीनंतर त्या पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

पुणे पोलीस आयुक्तांची घेणार भेट

चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती घेतली त्यांना भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी मदत केली. संजय राठोडांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता त्यांनी मी पत्रकार परिषदेमध्ये सगळं बोलेन असे सांगितले. तसेच चित्र वाघ यांच्याकडून इमारतीची पाहणी करण्यापूर्वी पूजा चव्हाणच्या प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली. चित्रा वाघ दुपारी १ वाजता पुणे पोलीस आयुक्तांची या प्रकरणासंदर्भात भेट घेणार आहेत.

काय म्हणाले चित्रा वाघ

“मला आताही विश्वास आहे, मुख्यमंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात लक्ष घालतील.
त्यांना ही संपूर्ण घटना माहिती आहे. ते वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतील.
मुख्यमंत्री राठोड यांच्यासारख्या घाणेरड्या माणसाला मंत्रीमंडळातून हाकलून देतील, असा अजूनपर्यंत विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांच्याकडून देण्यात आली आहे.
यावेळी चित्रा वाघ या संजय राठोड यांच्या राजीनाम्यासंदर्भात अधिक आक्रमक झाल्या होत्या.
तसेच “मंत्रिमंडळातल्या बाकी मंत्र्यांचं सोडून द्या, पण मुख्यमंत्र्यांची छवी ही चांगली आहे.
महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे अतिशय संवदेनशील व्यक्तीमत्व म्हणून बघते.
त्यामुळे ते राठोडांबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष आहे”, असेसुद्धा चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

ज्येष्ठांच्या सांभाळासाठी आणखी एका कायद्याचा ‘आधार’; मोदी सरकारचे आणखी एक पाऊल

Related Posts