IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 216 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
pune corona | 216 new corona patients in pune city in last 24 hours find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 182 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 216 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 91 हजार 444 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 80 हजार 424 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 06 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8874 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुण्यात 2146 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 2146 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 208 रुग्ण गंभीर आहेत. तर 249 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9668 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 30 लाख 45 हजार 891 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.55 %
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 2 हजार 259 रुग्णांपैकी 10 लाख 75 हजार 261 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 8 हजार 551 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 447 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.55 टक्के आहे.

 

Web Title :- pune corona | 216 new corona patients in pune city in last 24 hours find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 167 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पतीचे जावेसोबत प्रेमसंबंध, पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्याच्या विश्रांतवाडी येथील टिंगरेनगर परिसरातील घटना

Kolhapur Crime | अपत्य प्राप्तीसाठी नराधमाने डॉक्टर मित्राच्याच 7 वर्षाच्या मुलाचा दिला बळी! थरकाप उडवणारी घटना

 

Related Posts