IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 867 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, 867 patients of 'Corona' were discharged in Pune city, find out other statistics

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोना बाधित (Pune Corona Update) रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून चढ-उतार पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 448 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 867 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शहरात आजपर्यंत 44 लाख 51 हजार 727 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे. यामध्ये 6 लाख 58 हजार 326 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Update) आढळून आले आहे. त्यापैकी 6 लाख 45 हजार 964 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आज शहरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 333 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 3 हजार 029 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 145 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Invasive ventilator) वर 21 तर नाॅन इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर (Non-Invasive ventilator) 18 रुग्ण आहेत.
एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 15.64 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | In the last 24 hours, 867 patients of ‘Corona’ were discharged in Pune city, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune NCP | पुणे महानगरपालिकेतील विविध प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

Pune Crime | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांकडून अटक; 13 लाखाचा मुद्देमाल जप्त

Natural Mouth Fresheners | श्वासाची दुर्गंधी येतेय, तर या 4 नॅचरल माऊथ फ्रेशनरचा करा वापर

Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला रोखठोक इशारा, ‘उखाडना है तो उखाड लो’

 

Related Posts