IMPIMP

Pune Corporation | पुण्याच्या बाणेर परिसरातील सर्वाधिक भूखंडांचा होणार लिलाव

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –   Pune Corporation | महापालिकेने स्थायी समितीच्या बैठकीत शहरातील २६९ अँमेनिटी स्पेस (amenity space) भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत सर्वाधिक बाणेर (baner) भागातील ४२ भूखंड लिलावात असणार आहेत. त्याच बरोबर खराडीतील २८, कोंढव्यातील २७, बालेवाडीतील २३, वडगाव बुद्रूक १९ जागांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे पेठांमध्ये एकही अँमेनिटी स्पेस रिकामी नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, गुरुवारी महापालिकेच्या (Pune Corporation) मुख्यसभेत यावर अंतिम निर्णय होणार आहे. ३० वर्षासाठी या अँमेनिटी स्पेस भाड्याने देताना त्यांचा एकरकमी भाडे भरून घेतल्याने महापालिकेस एक हजार ७५३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, त्यातून विकासाचे प्रकल्प मार्गी लावता येतील असा दावा केला जात आहे. मात्र याला काही सामाजिक संस्था, संघटनांनी विरोध केला असून त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तर महापालिकेतील विरोधी पक्षांनीही विरोधाचीच भूमिका घेतली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

महापालिकेने अँमेनिटी स्पेसच्या दोन याद्या तयार केल्या आहेत. एक यादी १८४ अँमेनिटी स्पेसची आहे. तर दुसरी ८५ आरक्षणाच्या जागांची यादी आहे.
उपनगरांमध्ये गेल्या काही वर्षात सर्वाधिक नविन बांधकामे झालेले आहेत. १९८७ च्या विकास आरखड्यात दाखविलेली आरक्षणे तसेच अँमेनिटी
स्पेसच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. त्यापैकी महापालिकेने ५५६ जागांचा विकास केला असून शहराच्या विविध २२ भागातील २६९
जागा या रिकाम्या असल्याने त्यांचा लिलाव करून भाड्याने दिल्या जाणार आहेत. पहिल्या पाच मध्ये बाणेर ४२, खराडी २८, कोंढवा २७, बालेवाडी २३,
वडगाव बुद्रूक १९ या जागांचा समावेश आहे. तसेच आंबेगाव ११, बावधन खुर्द १२, धायरी ८, हडपसर १७, हिंगणे ३, कोथरूड ४, एरंडवणा १, लोहगाव
१४, महंमदवाडी १४, मुंढवा ९, पाषाण ९, उंड्री ३, वडगाव शेरी ४, वारजे १, येवलेवाडी ८, कात्रज ६, धानोरी १ या भागात जागा आहेत,अशी माहिती
महापालिका प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, महापालिकेने भाड्याने देण्यासाठी ज्या २६९ अँमेनिटी स्पेसची यादी तयार केली आहे त्यातील काही भूखंड अर्धा एकर पेक्षा मोठे आहेत.
यामध्ये १८५ अँमेनिटी स्पेसचे क्षेत्र ५४ एकर इतके आहे. तर आरक्षणाच्या ८५ भूखंडांचे क्षेत्र ६७ एकर इतके आहे, यामध्ये खराडीतील तीन जागा एक
एकरपेक्षा मोठ्या आहेत. तर वडगाव शेरी येथील एक जागा दोन एकर पेक्षा जास्त आहे, या जागेचे क्षेत्रफळ २४ हजार ३३३ चौरस मिटर आहे. या चारीही
जागांवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : pune corporation | most of the plots in baner will be auctioned for amenity space

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | केंद्रीय मंत्र्याचा अटकपुर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला, पोलिसांकडून नारायण राणेंना अटक

Narayan Rane | नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर गोंधळ ! नाशिकमध्ये BJP कार्यालयावर दगडफेक, मुंबईत भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

Ration Card | अपात्र रेशन लाभार्थ्यांना झटका, सरकार उचलत आहे मोठे पाऊल; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात सासर्‍यानं सुनेला चक्क ‘शॉर्ट कपडे’ घालण्यास सांगितलं, म्हणाला – ‘मला तुला बघायचंय’

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Corporation | पुणे महापालिकेतील अधिकारी अन् कर्मचार्‍यांचा 7 वा वेतन आयोग अंतिम मान्यतेसाठी रखडला; जाणून घ्या कारण

Kolhapur Crime | धक्कादायक ! ‘बेपत्ता’ मुलीला सावत्र पित्यानेच पंचगंगा नदीत फेकले

 

Related Posts