IMPIMP

Ration Card | अपात्र रेशन लाभार्थ्यांना झटका, सरकार उचलत आहे मोठे पाऊल; जाणून घ्या

by nagesh
Ration Card | if someone else is bringing benefits on ration card then your card will be canceled and charge fine

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Ration Card | जर सरकारद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या रेशनचा फायदा तुम्हाला सुद्धा मिळत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकार लवरकच रेशन कार्ड (Ration Card) योजनेत मोठा बदल करणार आहे, ज्यामध्ये अपात्र लोकांना लाभ मिळणार नाही. मानक बदलण्याचा आराखडा जवळपास पूर्ण झाला आहे. याबाबत राज्यांसोबत मागील सहा महिन्यांपासून बैठकीच्या अनेक फेर्‍या सुद्धा झाल्याचे सचिव सुधांशु पांडेय यांनी सांगितले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

– संपन्न लोकांना सुद्धा मिळत आहे योजानेचा फायदा

अन्न आणि सार्वजनिक पुरवठा विभागाने दावा केला आहे की, देशभरात सुमारे 80 कोटी लोक नॅशनल फूड सिक्युरिटी अ‍ॅक्टचा लाभ घेत आहेत. यामध्ये अनेक लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, हे लक्षात घेवून सार्वजनिक वितरण मंत्रालय मानकांमध्ये बदल करत आहे.

या महिन्यात हे मानक फायनल केले जातील. नवीन मानक लागू झाल्यानंतर केवळ पात्र व्यक्तींना फायदा होईल. अपात्र लोक फायदा घेऊ शकणार नाही. हा बदल गरजूंना लक्षात घेऊन केला जात आहे.

तसेच, विभागाची आतापर्यंत ’वन नेशन, वन रेशन कार्ड योजना’ डिसेंबर 2020 पर्यंत 32 राज्य
आणि यूटीमध्ये लागू झाली आहे. सुमारे 69 कोटी लाभार्थी म्हणजे एनएफएसएच्या अंतर्गत येणारी
लोकसंख्या या योजनेचा लाभ घेत आहे. प्रति महिना सुमारे 1.5 कोटी लोक एका ठिकाणाहून
दुसर्‍या ठिकाणी जाऊन सुद्धा लाभ घेत आहेत.

 

Web Title : ration card shock ineligible ration beneficiaries

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात सासर्‍यानं सुनेला चक्क ‘शॉर्ट कपडे’ घालण्यास सांगितलं, म्हणाला – ‘मला तुला बघायचंय’

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Pune Corporation | पुणे महापालिकेतील अधिकारी अन् कर्मचार्‍यांचा 7 वा वेतन आयोग अंतिम मान्यतेसाठी रखडला; जाणून घ्या कारण

 

Related Posts