IMPIMP

Narayan Rane | केंद्रीय मंत्र्याचा अटकपुर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला, पोलिसांकडून नारायण राणेंना अटक

by nagesh
Narayan Rane | Union minister's pre-arrest bail application rejected by court, police arrest Narayan Rane

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी रत्नागिरी सत्र न्यायालयात दाखल केलेला जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली. नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) देखील जामीनासाठी अर्ज केला असून मुंबई उच्च न्यायालय राणे यांचा अर्ज स्वीकरत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करणार की फेटाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मुख्यमंत्र्यांच्या (CM) विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं (Nashik Police) एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं.
त्यानंतर राणे यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.
मात्र, त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

दरम्यान, नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप प्रमोद जठार यांनी केला आहे.
पोलिसांकडे राणेंना अटक करायला आहेत परंतु त्यांच्याकडे वॉरंट नसल्याचे जठार यांनी सांगितले.
नारायण राणे यांना अटक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर रत्नागिरीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

Web Title : Narayan Rane | Union minister’s pre-arrest bail application rejected by court, police arrest Narayan Rane

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर गोंधळ ! नाशिकमध्ये BJP कार्यालयावर दगडफेक, मुंबईत भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

Ration Card | अपात्र रेशन लाभार्थ्यांना झटका, सरकार उचलत आहे मोठे पाऊल; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात सासर्‍यानं सुनेला चक्क ‘शॉर्ट कपडे’ घालण्यास सांगितलं, म्हणाला – ‘मला तुला बघायचंय’

 

Related Posts