IMPIMP

Pune Crime | पॅथॉलॉजी लॅब सुरू करून देण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | आत्मामलिक रुग्णालय आणि साईधाम मेडिकल हबमध्ये पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याच्या नावाखाली 10 लाख रुपये अनामत रक्कम घेऊन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार घडला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) याप्रकरणी दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमनकुमार बंदोपाध्याय आणि संजय नंदू कोळी (रा. मोतानगर, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची (Pune Crime) नावे आहेत. याप्रकरणी मनोज हनुमंत माने (रा. काटेवाडी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माने यांच्या मालकीच्या बारामती आणि भवानीनगर (Bhavani Nagar) येथे लॅब आहेत. त्यांना कोळी यांनी मी आत्मामलिक रुग्णालय आणि साईधाम मेडिकल हबचा (Saidham Medical Hub) सीईओ असल्याचे सांगितले. तसेच आम्हाला तुम्हाला संस्थेतर्फे लॅब चालविण्यास द्यायची आहे म्हणत, त्यांच्यासोबत भाडे करारनामा केला. लॅब चालविण्यास देण्यासाठी फिर्यादी माने यांनी दहा लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यांनी संस्थेच्या खात्यावर वेळोवेळी 10 लाख रुपये जमा केले. त्यानंतर माने यांनी लॅब सुरू करण्याबाबात विचारणा केली असता दोन्ही आरोपींनी टाळाटाळ केली. (Pune Crime)

 

माने यांनी याप्रकरणी संस्थेचे चेअरमन डॉ. सुमन कुमार बंदोपाध्याय यांच्यासोबत संपर्क साधला.
त्यांनी माने यांना करार रद्द करण्यास सांगितले आणि त्यानुसार त्यांच्या खात्यावर दहा दिवसांत दहा लाख
रुपये पाठविण्याचे आश्वासन दिले. पण करार रद्द करूनही कुमार यांनी पैसे पाठविले नाहीत.
पुढे माने यांनी पैशांचा तगादा लावला, पण त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर माने यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | 10 lakhs cheated by lure of pathology lab in baramati pune crime news

 

हे देखील वाचा :

Nana Patole On Gujarat Election Results | ‘भय, भ्रष्टाचार, भूक अशा गोष्टींचा वापर गुजरात निवडणुकीत झाला’; गुजरात निवडणूक निकालावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

CM Eknath Shinde On Pen Urban Bank Scam | गोरगरिबांचे पैसे त्यांना परत करा; पेण अर्बन बँक घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आदेश

Mumbai Crime | मुलाने संपत्तीसाठी केली आईची हत्या; मुंबईमधील घटना

Solapur Crime | पुण्यातील भाडयाच्या घरात सुरू होती बनावट नोटांची छापाई; सोलापूर पोलिसांनी छापा टाकत जप्त केल्या नोटा

 

Related Posts