IMPIMP

Pune Crime | देवीच्या पूजेवरुन 3 भावांनी थोरल्या भावाला चोपले; पुण्याच्या धनकवडीमधील घटना

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | देवीच्या पूजेवर झालेल्या वादात तिघा भावांनी थोरल्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Pune Crime) करुन बेदम चोपले़ ही घटना धनकवडीतील चव्हाणनगर (chavan nagar dhankawadi) येथे घडली.

याप्रकरणी सुनिल सुरेश पवार (वय ४३, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी भावड्या सुरेश पवार (वय ३३), संतोष सुरेश पवार (वय ४०), अनिल सुरेश पवार (वय ३७) कावेरी भावड्या पवार (सर्व रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल पवार हे लिंबु विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी सायंकाळी सात वाजता देवीच्या पुजेच्या कारणावरुन त्यांचा तीन लहान भाऊ व भावजयीशी वाद झाला. या वादात भावड्या व संतोष यांनी फिर्यादी यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अनिल पवार याने फिर्यादीच्या घरातील काठी घेऊन त्याने फिर्यादी यांच्या कपाळावर, हातावर, कानावर व उजव्या पायावर मारुन जखमी केले. सुनिल पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) चौघांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. हवालदार खुटवड तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | 3 brothers slapped elder brother for worshiping Goddess; Incident in Dhankawadi, Pune

 

हे देखील वाचा :

Dangerous Apps | ‘हे’ 7 अ‍ॅप्स तुमच्या फोनसाठी धोकादायक ! Google ने बॅन केलीत, आता तुम्ही सुद्धा तात्काळ करा डिलिट

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात ! सुदैवाने जीवित हानी नाही, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Coronavirus in India | देशात कोरोना’ची 8865 नवी प्रकरणे आली समोर, 287 दिवसात आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा

 

Related Posts