IMPIMP

Coronavirus in India | देशात कोरोना’ची 8865 नवी प्रकरणे आली समोर, 287 दिवसात आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा

by nagesh
Coronavirus in India | corona update covid 19 corona cases 88865 india health ministry

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना (Coronavirus in India ) ची प्रकरणे हळुहळु कमी होत आहेत. मागील 24 तासात कोरोनाची 8,865 नवी प्रकरणे समोर आली जी मागील 287 दिवसातील सर्वात कमी आहेत. तर एक दिवसात 197 लोकांचा मृत्यू झाला आहे. रिकव्हरी रेट 98.27% आहे. जो मागील मार्च 2020 पेक्षा सर्वात जास्त आहे. तर कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांबाबत बोलायचे तर 1,30,793 आहेत, जी मागील 525 दिवसांमधील (Coronavirus in India) सर्वात कमी आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मागील 24 तासात कोरोनातून 11,971 लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे एकुण 3, 38,61,756 लोक बरे झाले आहेत. डेली पॉझिटिव्हीटी रेट 0.80 टक्के आहे, जो मागील 43 दिवसांपासून 2 टक्के खाली आहे. विकली पॉझिटिव्हिटी रेट 0.97 टक्के आहे जो मागील 53 दिवसांपासून 2 टक्केने खाली आहे. मागील 24 तासात 59,75,469 व्हॅक्सीनेशन झाले. आतापर्यंत एकुण 1,12,97,84,045 व्हॅक्सीनेशन झाले आहे. (Coronavirus in India)

 

 

कालच्या तुलनेत इतकी कमी झाली प्रकरणे

देशात काल कोरोनाची 10,229 नवी प्रकरणे समोर आली होती. या दरम्यान कोरोनामुळे 125 लोकांचा मृत्यू झाला होता. तर कोरोनाच्या एकुण प्रकरणांबाबत बोलायचे तर काल त्यांची संख्या 34,447,536 होती. कोरोनातून 11,926 लोक बरे झाले होते. एकुण 33,849,785 लोक कोरोनातून बरे झाले होते. तर कोरोनामुळे आतापर्यंत 463,655 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

महाराष्ट्रात संसर्गाची 686 नवी प्रकरणे

महाराष्ट्रात सोमवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 686 नवी प्रकरणे समोर आली तर 19 लोकांचा मृत्यू झाला,
ज्यानंतर राज्यात संक्रमित होणारे आणि मरणार्‍यांची आतापर्यंतची एकुण संख्या वाढून अनुक्रमे 66,24,986 आणि 1,40,602 झाली आहे. दरम्यान, दिल्लीत कालच्या दिवसात 16 नवीन प्रकरणे समोर आली तर एकाचा मृत्यू झाला.

 

Web Title: Coronavirus in India | corona update covid 19 corona cases 88865 india health ministry

 

हे देखील वाचा :

Pune | युवा शास्त्रज्ञ भीमाशंकर गुरव यांचा मंत्री दत्तात्रय भरणे व धिरज केसकर यांच्याकडून विषेश सत्कार

Anti Corruption Bureau Thane | लाच घेण्यासाठी ‘तो’ कार्यालयात रात्री साडेआठ वाजेपर्यंत थांबला; जात पडताळणी समितीचा सचिव ACB च्या जाळयात

Gold Price Today | सोन्याच्या दरात आली तेजी, आज किती रूपयांनी महागले 1 तोळा सोने, जाणून घ्या

 

Related Posts