IMPIMP

Pune Crime | हडपसरमध्ये 30 वर्षीय महिलेवर बलात्कार, गर्भवती करुन लग्नास नकार

by nagesh
https://policenama.com/pune-crime-demand-for-physical-relation-from-a-woman-running-a-cafe-in-pune-fir-against-shop-owner-mahesh-muralidhar-shinde/

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मुलाचा वडिलांप्रमाणे सांभाळ करेल, असे वचन देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारिरीक संबंध (Physical Relation) ठेवले. त्यातून ती गर्भवती (Pregnant) राहिल्यावर तुझा गर्भ पाडून टाक, असे सांगून लग्नास नकार देऊन फसवणुक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुधीर अर्जुन बंकपल्ली Sudhir Arjun Bankapalli (वय ३५, रा. अ‍ॅमेनोरा पार्क, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१९ पासून ५ जानेवारी २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे अ‍ॅमेनोरा पार्क या मोठ्या सोसायटीत राहतात. सुधीर बंकपल्ली याने फिर्यादीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखविले. तिच्या मुलाचा वडिलाप्रमाणे सांभाळ करेल, असे वचन देऊन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिला फिरायला घेऊन जाऊन तिच्याबरोबर शारिरीक संबंध (Rape in Pune) केले. यातून फिर्यादी या गर्भवती राहिल्या. याची माहिती तिने सुधीर व त्याच्या आईवडिलांना सांगितली. तेव्हा त्यांनी फिर्यादीला तू तुझा गर्भ पाडुन टाक. तो तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तू जर तसे केले नाही तर तुला व तुझ्या मुलाला आम्ही जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरून शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक खळदे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 30 year old woman raped in Hadapsar refused to marry after getting pregnant

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ संजय पाटोळेचा डोक्यात गोळी झाडून खून; शिरवळमध्ये प्रचंड खळबळ&nbsp

Eknath Khadse | ‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण…’; नाथाभाऊ देवेंद्र फडणवीसांवर बरसले !

Pune Crime | पुण्याच्या कात्रज परिसरातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला 12 तासात अटक

 

Related Posts