IMPIMP

Pune Crime | पुण्यातील ‘मटका किंग’ संजय पाटोळेचा डोक्यात गोळी झाडून खून; शिरवळमध्ये प्रचंड खळबळ

by nagesh
Nanded Firing Case | nanded firing case woman congress worker firing in nanded three people

पुणे / सातारा : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यातील कात्रज (Katraj) परिसरातील मटका व्यवसायिकाच्या (Matka King) डोक्यात
गोळी झाडून खून (Murder In Shirval) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संजय सुभाष पाटोळे Sanjay Subhash Patole (वय ३६,
रा. बिबवेवाडी – Bibvewadi) असे खून झालेल्या मटका व्यावसायिकाचे नाव आहे. ही घटना खंडाळा (Khandala) तालुक्यातील शिरवळ (Shirval)
येथील फुलमळा परिसरातील लेक पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी (Shirval Police) एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय पाटोळे हा मटका किंग म्हणून  प्रसिद्ध होता.  तो कामासाठी बाहेर जात असल्याचे सांगून रविवारी सकाळी ७ वाजता पुण्यातील घरातून बाहेर पडला. त्याच्याबरोबर एक जण होता. त्यानंतर शिरवळ येथील लेक पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक इमारतीत राहणारी एक महिला गेली. तेव्हा तेथे तिला एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. तिने हा प्रकार पतीला सांगितला. पतीने याची माहिती पोलिसांना कळविली. शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने (Police Inspector Navnath Madne) व त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाच्या खिशात आधार कार्ड (Aadhaar Card) आढळून आले. (Pune Crime)

 

त्यावरुन ती व्यक्ती संजय पाटोळे असून ती पुण्यातील मटका व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली. या इमारतीच्या खालीच संजय पाटोळे याची गाडी उभी होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर त्याचे नातेवाईक शिरवळला पोहचले आहेत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल (SP Ajaykumar Bansal) यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, लेक पॅलेस ही जुनी इमारत असून तेथे सर्व लोक रहायला आले आहेत.
संजय पाटोळे याची गाडी इमारतीच्या बाहेर पार्क केली होती. इमारतीमध्ये त्याच्या ओळखीचे कोणी नाही.
कोणीतरी त्याला इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेले. तेथे त्याच्यावर अगदी जवळून गावठी कट्ट्यातून गोळी झाडून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून येत आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Murder Of Matka King Sanjay Subhash Patole at Shirval Satara

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | ‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण…’; नाथाभाऊ देवेंद्र फडणवीसांवर बरसले !

Pune Crime | पुण्याच्या कात्रज परिसरातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला 12 तासात अटक

Maharashtra Police | जबरी चोरी अन् खंडणी प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर FIR, राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ

 

Related Posts