IMPIMP

Pune Crime | पुण्यातील सुप्रसिध्द बिल्डरची 5.5 कोटींची फसवणूक ! कोंढवा पोलिस ठाण्यात फारूक इनामदार, अफान इनामदार आणि अमितकुमार सिन्हा विरूध्द गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Fraud with money on the pretext of child's operation; Case filed against father and daughter, forged signatures of deceased husband

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | जागा विकसन करायला दिली असताना त्यावर TDR विकत घेण्यास हरकत घेतली. बांधकाम करारानुसार ५ कोटी ३५ लाख व हात उसने घेलेले ५२ लाख ६५ हजार रुपये परत न करता परस्पर सदनिकांची विक्री करुन गुंडांमार्फत गाळ्यांचा ताबा घेण्याचा प्रकार समोर आला आहे.

 

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक राहुल प्रेमप्रकाश गोयल Builder Rahul Premprakash Goyal (वय ३८, रा. सिटी टॉवर, ढोले पाटील रोड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८७४/२२) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी फारूक यासीन सय्यद इनामदार Farooq Yasin Syed Inamdar
(रा. मुस्सादिक कॉम्प्लेक्स, मोहम्मदवाडी), अफान इनामदार Afan Inamdar आणि अमितकुमार सिन्हा Amit Kumar Sinha यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार हडपसर (Hadapsar) स. नं. ६३/२ बी, २ ए व ६३/२ डी येथे २०१२ ते २४ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे.
आरोपी फारुक इनामदार यांच्या मालकीच्या जागेवर विकसन करण्याचे काम फिर्यादी यांना दिले होते.
आरोपी यांनी फिर्यादीस TDR विकत घेऊन न दिल्यामुळे बांधकामास विलंब होऊन फिर्यादी यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
फिर्यादी यांनी पुणे महापालिकेकडे Pune Municipal Corporation (PMC) पेड एफएसआयसाठी (Paid FSI)
अर्ज करुन मान्य करुन घेतला.
तेव्हा आरोपी यांनी परस्पर पुणे मनपा येथे जाऊन पेड एफ एस आय साठी खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन हरकत नोंदवून फिर्यादीचे कामात अडथळा निर्माण करुन फिर्यादीची फसवणूक केली. (Pune Crime)

फिर्यादी यांना बांधकाम करारात ठरल्याप्रमाणे ५ कोटी ३५ लाख रुपये आणि हात उसने घेतलेले ५२ लाख ६५ हजार रुपये परत न करता चेक देऊन चेक बाऊन्स झालेले आहेत.
तसेच आरोपी यांनी बेकायदेशीररित्या त्यांना कोणताही अधिकार नसताना घर बेचो डॉट कॉम या कंपनीमार्फत
दस्त नोंदणी करुन सदनिका विक्री करुन प्रकल्पाचे ठिकाणी गुंड पाठवून घुसखोरी केली.
कमर्शियल शॉपची कुलूपे तोडून ताबा घेतले. बांधकाम बंद पाडून रहिवासी यांना येण्या जाण्यास प्रतिबंध केला आहे,
म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मोगले तपास करत आहेत.

 

Web Title : –  Pune Crime | 5.5 crore fraud of a well known builder in Pune A case has been registered against Farooq Inamdar Afan Inamdar and Amit Kumar Sinha in Kondhwa Police Station

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts