IMPIMP

Pune Crime | मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यु; पुण्याच्या बोपदेव घाटाजवळील घटना

by nagesh
Pune Crime | A 15-year-old boy from sambhaji nagar dhankawadi who went to celebrate a friend’s birthday drowned in a lake; Incident near Bapdev Ghat in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या मुलांपैकी एकाचा बोपदेव घाटातील (Bopdev Ghat) पठारवाडी तलावात बुडून मृत्यु (Pune Crime) झाला. अनिश तानाजी खेडेकर (वय 15, रा. संभाजीनगर, धनकवडी – Sambhaji Nagar – Dhankawadi) असे त्याचे नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

धनकवडी येथील एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी 9 मुले बोपदेव घाटात गेले होते.
तेथील पठारवाडी येथील तलावाजवळ ते वाढदिवस साजरा करीत होते.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फोटो काढण्यासाठी ते तलावाच्या पाण्यात उतरले.
यावेळी अनिश खेडेकर व आणखी एक जण पाण्यात बुडू लागले.
तेव्हा इतरांनी एकाला वाचविले. मात्र, अनिश पाण्यात बुडाला (Pune Crime). त्याच्या मित्रांनी खूप शोध घेतला पण तो मिळून आला नाही. त्यामुळे सर्व जण घाबरुन गेले होते.
रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला याची वर्दी देण्यात आली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उतरत लाईफ रिंगच्या मदतीने अनिश याचा मृतदेह रात्री साडेअकरा वाजता बाहेर काढला. कोंढवा (Kondhwa) अग्निशमन केंद्राचे रवींद्र हिरवरकर, जवान दशरथ माळवदकर, संदीप पवार, औंकार ताटे, गोविंद गित्ते यांनी मृतदेह बाहेर काढला.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title: Pune Crime | A 15-year-old boy from sambhaji nagar dhankawadi who went to celebrate a friend’s birthday drowned in a lake; Incident near Bapdev Ghat in Pune

 

हे देखील वाचा :

EPFO-PPO | ‘हा’ नंबर पेन्शनर्ससाठी अतिशय महत्वाचा, अन्यथा अडकू शकतात तुमचे सर्व पैसे; जाणून घ्या

Guavas Benefits | वजन कमी करा, खोकला-सर्दीपासून बचाव करा, थंडीमध्ये पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत असंख्य फायदे

Petrol-Diesel Price Cut | राजस्थान सरकारनेही इंधनावरील व्हॅट केला कमी; महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी कधी होणार?

Mumbai Police | कौतुकास्पद ! नाल्यातून वाहत जात होतं ‘नवजात’ बाळ, ‘म्याव-म्याव’ करून मांजरांनी केलं अलर्ट, मुंबई पोलिसांनी अर्भकाला वाचवलं

Manika Batra | ऑलिम्पियन मनिका बत्राला उच्च न्यायालयाकडून ‘क्लीन चिट’; म्हणाले – ‘खेळाडूंना नाहक त्रास नको’

 

Related Posts