IMPIMP

EPFO-PPO | ‘हा’ नंबर पेन्शनर्ससाठी अतिशय महत्वाचा, अन्यथा अडकू शकतात तुमचे सर्व पैसे; जाणून घ्या

by nagesh
EPFO | good news pensioners epfo launches face recognition facility will help senior citizens

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO-PPO | एम्प्लॉई पेन्शन स्कीम अंतर्गत येणार्‍या पेन्शनधारकांना (Pensioners) एक युनिक नंबर जारी केला जातो, ज्याच्या मदतीने ते निवृत्तीनंतर पेन्शन प्राप्त करू शकतात. या नंबरला पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) म्हटले जाते. कोणत्याही कंपनीतून निवृत्त होणार्‍या व्यक्तीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) हा नंबर जारी केला जातो. (EPFO-PPO)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

निवृत्तीनंतर ईपीएफओ (EPFO) कर्मचार्‍याला एक लेटर जारी करते, ज्यामध्ये पीपीओच्या (PPO) डिटेल्स असतात. जर एखाद्या व्यक्तीने आपला पीपीओ नंबर हरवला तर तो आपल्या बँक खात्याच्या मदतीने सहज प्राप्त करू शकतो. यासाठी कोणती प्रक्रिया आहे जाणून घेवूयात. (EPFO-PPO)

 – सर्वप्रथम कर्मचारी भविष्य निधी संघटनेची वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/index.php वर जा.

– आता लेफ्ट साईडमध्ये दिलेल्या ऑनलाइन सर्व्हिसेस सेक्शनमध्ये Pensioners Portal च्या पर्यायावर क्लिक करा.

– क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल. या पेजवर लेफ्ट साईडला असलेल्या Know Your PPO No. पर्यायावर क्लिक करा.

– येथे तो बँक अकाऊंट नंबर टाका, जो तुमच्या पेन्शन फंडशी लिंक्ड आहे. किंवा PF नंबर ज्यास मेंबर आयडी सुद्धा म्हणतात, तो टाकून सर्च करा.

– डिटेल्स यशस्वीपणे सबमिशननंतर PPO नंबर स्क्रीनवर दिसू लागेल.

असाही मिळवू शकता पीपीओ नंबर

याशिवाय https://mis.epfindia.gov.in/PensionPaymentEnquiry/ ला नवीन टॅबमध्ये उघडून सुद्धा पीपीओ नंबर प्राप्त करू शकता. पीपीओ नंबर संबधित माहिती प्राप्त करण्यासाठी ईपीएफओची वेगळी वेबसाइट आहे. येथे जीवन प्रमाणपत्र, पीपीओ नंबर, पेमेंटसंबंधी माहिती आणि पेन्शन स्टेटसबाबत माहिती प्राप्त करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

का आवश्यक आहे PPO नंबर

नेहमी पासबुकवर पेन्शन ऑर्डर नंबर नोंदवून ठेवा.
एका शाखेतून दुसर्‍या शाखेत पेंशन अकाऊंट ट्रान्सफर केल्यानंतर पासबुकमध्ये पीपीओ नंबर नसतो, अशावेळी समस्या होऊ शकते.
यामुळे पेन्शन जारी होण्यास उशीर होऊ शकतो. (EPFO-PPO)

याशिवाय, जर तुमच्या पेन्शनसंबंधी एखादी तक्रार ईपीएफओमध्ये नोंदवायची असेल तर तिथे सुद्धा पीपीओ नंबर देणे अनिवार्य आहे. ऑनलाइन पेन्शन स्टेटस जाणून घेण्यासाठी सुद्धा पीपीओ नंबरची आवश्यकता असते.

 

Web Title: EPFO-PPO | epfo ppo number get it with bank account and pf number check know how

 

हे देखील वाचा :

Guavas Benefits | वजन कमी करा, खोकला-सर्दीपासून बचाव करा, थंडीमध्ये पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत असंख्य फायदे

Petrol-Diesel Price Cut | राजस्थान सरकारनेही इंधनावरील व्हॅट केला कमी; महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी कधी होणार?

Mumbai Police | कौतुकास्पद ! नाल्यातून वाहत जात होतं ‘नवजात’ बाळ, ‘म्याव-म्याव’ करून मांजरांनी केलं अलर्ट, मुंबई पोलिसांनी अर्भकाला वाचवलं

 

Related Posts