IMPIMP

Pune Crime | मित्रच बनला वैरी, दगडाने ठेचून एकाचा खून ! आरोपी शिवाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात

by nagesh
Pune Crime | A friend became an enemy one was killed by being stoned Accused in Shivajinagar police net

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivaji Nagar Police Station) हद्दीतील राष्ट्रवादी भवन (NCP) समोरील डेंगळे ब्रिज (Dengle Bridge) खाली नदीकाठी दगडाने ठेचलेला एक मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. शिवाजीनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन अवघ्या 12 तासात आरोपीला अटक (Arrest) केली आहे. मृत व्यक्तीच्या मित्रानेच (Friend) पैशाच्या वादातून (Money Disputes) खून (Murder) केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीने मित्राची ओळख पटू नये यासाठी चेहरा दगडाने (Pune Crime) ठेचला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डेंगळे ब्रिज (Dengle Bridge Pune) खाली मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत व्यक्तीची ओळख पटवत असताना पोलिसांना मृतदेहाजवळ एक मोबाइल (Mobile) सापडला. हाच धागा पकडून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. काही वेळाने मोबाईलवर एक कॉल आला कॉल करणारा व्यक्ती पैशांची मागणी करत होता. या कॉलचा पाठपुरावा करुन शिवाजीनगर पोलिसांचे पथक बुधवार पेठेत (Budhwar Peth) पोहचले. (Pune Crime)

 

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे (Technical Analysis) फोन करणाऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी (Inquiry) ताब्यात घेतले. संशयित व्यक्तीकडे चौकशी केली असता आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) संशयित आरोपीची हालचाल पाहिली असता दोन्ही गोष्टीत भिन्नता आढळून आली. मयत व्यक्तीची ओळख पटली परंतु खून कोणी केला याचा शोध लागला नाही.

 

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस परिसरातील CCTV फुटेज तपासत असताना या गुन्ह्याचा उलगडा होत गेला. मृत व्यक्तीच्या मित्राकडे चौकशी केली असता तो पोलिसांना चुकीची माहिती देत होता. मयत इसमाच्य मित्राची प्रत्येक गोष्ट पोलीस करत असलेल्या इंट्रोगेशन मध्ये खोटी ठरत होती. परंतु संशयाची सुई त्याच्यावरच होती. अखेर मयत व्यक्तीच्या मित्रानेच पैशांच्या कारणावरुन दारु पाजून दगडाने ठेचुन खून केल्याची कबुली दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 प्रियांका नारनवरे (DCP Priyanka Narnaware),
सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने (ACP Ramakant Mane),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More),
पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (Police Inspector Vikram Gaud),
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Police Inspector Shailesh Sankhe)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक (API Bajirao Naik),
पोलीस उप निरीक्षक अतुल क्षिरसागर (PSI Atul Kshirsagar), भैरवनाथ शेळके (PSI Bhairavnath Shelke),
सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस हवालदार बशीर सय्याद, अविनाश भिवरे, कांतीलाल गुंड, प्रविण राजपुत,
अतुल साठे, प्रशांत शिंदे, पोलीस अंमलदार अनिकेत भिंगारे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | A friend became an enemy one was killed by being stoned Accused in Shivajinagar police net

 

हे देखील वाचा :

Thigh Fat Exercises | मांड्यांची चरबी कमी करण्यासह त्यांना आकारात आणण्यासाठी उत्तम आहेत ‘हे’ 3 व्यायाम; जाणून घ्या

Pravin Darekar | प्रवीण दरेकरांना सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा ! कोर्टानं मुंबई पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

Side Plank Benefits | पाठ, पोट आणि कंबरेला चांगला आकार देण्यासाठी रोज काही सेकंद आवश्य करा ‘हे’ आसन

 

Related Posts