IMPIMP

Pune Crime | भावाबरोबर लिव्ह इनमध्ये राहणार्‍या तरुणीला परत पाठविण्यास विरोध केल्याने महिलेला मारहाण

by nagesh
Pune Crime | a lemon sorbet seller was robbed at gunpoint during the day Pune Crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | भावाबरोहर लिव्ह इनमध्ये (Live In) राहणार्‍या तरुणीला भावाबरोबर परत पाठवा, असे सांगणार्‍यांना विरोध केल्याने तरुणीच्या नातेवाईकांनी महिलेला मारहाण (Beating) करुन किराणा दुकानाची नासधुस केली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी कोंढव्यातील एका ३२ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (ग़ु. रजि. नं. ९१६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुनिता हिची आई, बहिण, अक्षय शिवशरण, संजय बनसोडे, अशोक बनसोडे, व अन्य तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील लक्ष्मीनगर येथे बुधवारी सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरी त्यांचा भाऊ अनिल याच्यासोबत सुनिता ही लिव्ह इनमध्ये राहते. तिची आई, बहिण व इतर नातेवाईक त्यांच्या घरी आले.
त्यांनी सुनिता हिला त्यांच्या भाऊ अनिल याचे सोबत त्यांच्या घरी राहण्यास पाठवा, असे सांगितले.
त्याला फिर्यादी महिलेने विरोध केला. तेव्हा त्यांनी शिवीगाळ करुन फिर्यादी तसेच कुटुंबातील इतरांना मारहाण करुन
जखमी केले. त्यानंतर रात्री साडे आठ वाजता पुन्हा ते आले.
त्यांनी शिवीगाळ करुन फिर्यादी यांच्या बहिणीचे किराणा दुकानातील मालाची नासधुस केली. सहायक पोलीस
निरीक्षक शिंदे (Assistant Police Inspector Shinde) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A woman was beaten up for resisting the repatriation of a young woman living in a live in with her brother

 

हे देखील वाचा :

Cardiac Arrest | माता पार्वती बनून नाचणार्‍या व्यक्तीला आला हार्ट अटॅक… स्टेजवरच मृत्यू, Video

Tax On Gifts | गिफ्टमध्ये सोने मिळाले आहे का? येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस

Nashik ACB Trap | 3000 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

NEET Exam Result | नीट परीक्षेत दुसऱ्यांदा कमी मार्क मिळाले, रोहिणीने जीवनयात्रा संपवली

 

Related Posts