IMPIMP

Pune Crime | पतीच्या निधनानंतर 29 वर्षीय महिलेवर दिराचा वॉच; थेट वहिनीच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे अन्…

by nagesh
Pune Crime | Accident on Pune-Nagar Highway near shikrapur 5 dead pune cctv footage of horrific accident

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पिंपरी (Pimpri) परिसरामधील एक धक्कादायक प्रकार (Pune Crime) समोर आला आहे.
पतीच्या निधनानंतर 59 वर्षीय महिलेेवर वाॅच ठेवण्यासाठी दीर आणि सासऱ्याने संबधित महिलेच्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera)
बसवल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचबरोबर आरोपींनी पीडित महिलेला आणि तिच्या लेकीला शिवीगाळ करत मारहाण केली. असा आरोप पीडित महिलेने केला. याप्रकरणी पीडित महिलेने दीर आणि सासऱ्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याबाबत माहिती अशी की, पीडित महिला सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या 29 वर्षीय मुलीसोबत राहत आहे. महिलेच्या पतीचं अलीकडेच निधन झालं आहे. पतीच्या निधनानंतर आरोपी दीर (वय. 58) आणि सासऱ्यांनी (वय, 92) तिचा छळ सुरू केला. पतीचं निधन होताच आरोपींनी पीडितेवर नजर ठेवता यावी, यासाठी तिच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. जेणेकरून घरात काय सुरू आहे? याची सर्व माहिती आरोपींना मिळू शकेल. संबधित आरोपींकडून पीडित महिलेवर 24 तास वॉच ठेवला जात होता. (Pune Crime)

 

 

तसेच, तुम्ही दोघीही आयत्यावर बिळावर बसला आहात, येथून निघून जा, असं म्हणून आरोपींनी मायलेकीला मारहाण, शिवीगाळ केली. आरोपीनं काही दिवसातच फिर्यादीच्या 29 वर्षीय मुलीलाही त्रास द्यायला सुरुवात केली. आणि भररस्त्यात त्यांना शिवीगाळ केली. याशिवाय आरोपी दिरानं फिर्यादीच्या मुलीबाबत अश्लील शेरेबाजी करत ‘तुझी तर सेटिंगच लावतो’ असं अश्लील बोलत पीडित मायलेकीचा छळ केला. या त्रासाला त्रस्त होऊन पिडित महिलेनं शेवटी शनिवारी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) धाव घेतली. याप्रकरणी दीर. सासऱ्याविरोधात पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर (PSI Kavita Rupner) करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Pune Crime | Accident on Pune-Nagar Highway near shikrapur 5 dead pune cctv footage of horrific accident

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

Pune Crime | पोलीस भरतीसाठी आला अन् वाईट संगतीला लागला; विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्याला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

Nagpur Crime | महिलांच्या अश्लील ‘न्यूड डान्स’ प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; 10 आयोजक, 3 नृत्यांगना ताब्यात

 

Related Posts