IMPIMP

Pune Crime | चंदनाची तस्करी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | चंदन तस्करी करणाऱ्या चोरट्याला (Sandalwood Thief) गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit 1) पथकाने सापळा रचून अटक (Arrest) केली. त्याच्याकडून चंदनाच्या झाडांचे ओंडके, दुचाकी असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) भवानी पेठेतील टिंबर मार्केट मध्ये (Timber Market Bhavani Peth) सोमवारी (दि.24) करण्यात आली आहे. त्याच्याकडून चंदन चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

निलेश बाळू डोळस Nilesh Balu Dolas (वय-30 रा. निगडी ओटा स्किम, मिलिंदनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. निलेश डोळस हा चंदनाचे ओंडके विक्री करण्यासाठी भवानी पेठेतील टिंबर मार्केट (Pune Crime) येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक अमोल पवार (Amol Pawar) यांनी मिळाली. त्यानुसार टिंबर मार्केट परिसरात सापळा रचला. डोळस दुचाकीवरुन आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये 4 चंदनाचे ओंडके आढळून आले. जप्त केलेल्या चंदनाच्या ओंडक्यांची किंमत एक लाख रुपये आहे. याप्रकरणी वनपरिमंडळ अधिकारी लोणी काळभोर मंगेश सपकाळ (Forest Officer Loni Kalbhor Mangesh Sapkale) यांनी सरकारतर्फे खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41,42,43 तसेच महाराष्ट्र वन नियमावली 2014 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Police Inspector Shailesh Sankhe), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, इम्रान शेख, मीना पिंजण यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Accused of smuggling sandalwood arrested from crime branch, Rs 1.5 lakh confiscated

हे देखील वाचा :

Malegaon News | मालेगावात काँग्रेसला मोठा धक्का ! सोनिया गांधींच्या विश्वासू नेत्यासह 27 नगरसेवक राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार

Pune Corporation | पुणे मनपात समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये पाणी टंचाई ! ‘राष्ट्रवादी’च्या वतीने महापालिकेत आंदोलन; अतिरिक्त आयुक्तांना प्रतिकात्मक टँकर भेट

Ravi Shastri | रवी शास्त्री यांचे विराट कोहलीच्या बचावात मोठं वक्तव्य; ‘6 वर्ल्ड कप खेळल्यानंतर सचिन तेंडुलकरनं एक जिंकला, म्हणून…’

Related Posts