IMPIMP

Pimpri Cheating Fraud Case | पिंपरी : कंत्राट देणाऱ्या कंपनीची 20 कोटी 44 लाखांची फसवणूक, एकाला अटक

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन – Pimpri Cheating Fraud Case | कंपनी निर्मितीच्या कामाचे कंत्राट मिळालेल्या कंपनीकडून करार करून सब-कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कंपनीच्या संचालकांनी आर्थिक फसवणूक केली. आरोपींनी तक्रारदार यांच्या कंपनीकडून कोट्यवधी रुपये घेऊन प्रत्यक्षात काम न करता 20 कोटी 44 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2016 ते 4 एप्रिल 2024 या रहाटणी आणि आसाम येथे घडला. याप्रकरणी धवल डिस्टील ईवॅप प्रा. लि. (Dhaval Distil Evap Private Limited) कंपनीच्या तीन संचालकांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

पिंपळे सौदागर येथील धवल डिस्टील ईवॅप प्रा. लि. (DDEPL) कंपनीचा संचालक रविंद्र भास्कर जयवंत (Ravindra Bhaskar Jaywant) याला अटक केली आहे. तर महिला आरोपी व संजीव रमेश राजे (Sanjeev Ramesh Raje) यांच्यावर आयपीसी 406, 409, 420, 465, 467, 471, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत टोम्सा डिस्टील इंडिया प्रा. लि. (TDIPL) कंपनीचे संचालक संदिप अशोक बनसुडे (वय-35 रा. पांजरपोळ भोसरी) यांनी पिंपरी चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडे (Pimpri Chinchwad EoW) तक्रार केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा (Wakad Police Station) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्य टोस्मा डिस्टील इंडिया प्रा. लि. या कंपनीला आसाम बायो रिफायनरी प्रा. लि. (ABRPL) चे नुमालिगड, जि. गोलाघाट आसाम येथे बांबूपासून बायो इथेनॉल निर्मिती प्रकल्पातील फर्मेंटेशन आणि इव्हॅपोरेशन या दोन सेक्शन उभारणीचे कंत्राट मिळाले होते. पिंपळे सौदागर येथील धवल डिस्टील ईवॅप प्रा. लि. कंपनीच्या आरोपी संचालकांनी फिर्य़ादी यांच्या कंपनीचा विश्वास संपादन करुन सब-कंत्राट करार करुन घेतले.

या प्रकल्पासाठी आरोपींनी टोम्सा कंपनीकडून 26 कोटी 28 लाख 13 हजार 652 रुपये घेतले. घेतलेल्या पैशांपैकी आरोपींनी प्रोजेक्ट साईटवर केवळ 5 कोटी 83 लाख 31 हजार 192 रुपयांचे मटेरिअल व प्रोजेक्ट उभारणीचे कामकाज केले. उर्वरित 20 कोटी 44 लाख 81 हजार 670 रुपये आरोपींनी DDEPL कंपनीच्या आणि स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. आरोपी रवींद्र जयवंत याने फिर्यादी यांच्या कंपनीने मुखत्यार धारक म्हणून दिलेल्या सहिच्या अधिकाराचा गैरवापर केला. खोट्या पर्चेस ऑर्डर दाखवून 20 कोटी 44 लाख 81 हजार 670 रुपयांची टोम्सा डिस्टील इंडिया कंपनीची फसवणूक केली. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक के.डी. सपकाळ (PSI KD Sapkal) करीत आहेत.

Pune Lonikand Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

Related Posts