IMPIMP

Pune Crime | प्रेमास नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून कोयत्याने वार, फुरसुंगी परिसरातील घटना

by nagesh
 Pune Crime News | A rickshaw puller attempted to force a young woman in Pune University; Taking advantage of rickshaws due to rain

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime | प्रेमास नकार दिल्याच्या कारणावरुन एका सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर कोयत्याने वार केला. मात्र, मुलीने कोयत्याचा वार चुकवल्याने ती थोडक्यात बचावली. ही घटना (Pune Crime) फुरसुंगी येथे मंगळवारी (दि.13) रात्री सव्वा सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) सराईत गुन्हेगारावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आशिष मारुती धणके (वय-24 रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी) याच्यावर आयपीसी 307, 450, 623, 354, 354ड, 506, पॉक्सो अ‍ॅक्ट (POCSO Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांचा ऑक्टोबर 2022 पासून पाठलाग करत होता.
फिर्यादी तरुणीने प्रेमास नकार दिल्याने आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी (Attempt to Kill) दिली.
याबाबत तरुणीने आरोपीच्या पत्नीला सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने मंगळवारी रात्री फिर्यादी यांच्या
घरात घसून कोयत्याने वार केला. मात्र, फिर्यादी यांनी कोयत्याचा वार चुकल्याने ती थोडक्यात बचावली.
यानंतर आरोपीने फिर्य़ादी यांच्या मैत्रिणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | An incident in Fursungi area where a minor girl who refused love was attacked with a sharp weapon

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘तु मला भाई म्हणत नाही’ तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून ब्लेडने वार, हडपसर परिसरातील घटना

SBI Interest Rate | एसबीआयच्या व्याजदरात कमालीची वाढ

Deepika Padukone-Pathan Song | पठाण चित्रपटातील गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकनीच्या रंगावरून नवा वाद सुरु; हिंदू महासभेने दिला इशारा

 

Related Posts