IMPIMP

Pune Crime | उद्योजक नानासाहेब गायकवाडसह मुलावर सावकारीचा आणखी एक गुन्हा

by nagesh
Pune Crime | Another crime registered on businessman Nanasaheb Gaikwad and ganesh gaikwad

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime | पुण्यातील उद्योजक नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad) याच्यासह तिघांवर महाराष्ट्र सावकारी कायद्यांतर्गत (Maharashtra Money-Lending (Regulation) act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) नानासाहेब गायकवाड, मुलगा गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड आणि राजू अंकुश यांच्यावर सावकारीचा गुन्हा (Pune Crime) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे. याप्रकरणी स्वप्निल गणपतराव बालवडकर Swapnil Balwadkar (वय-26 रा. क्लोरीस रेसीडेन्सी, बालेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्यावर जादूटोणा, सुनेवर अत्याचार तसेच बेकायदा सावकारी अशा अनेक गुन्ह्यात मोक्काची कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली आहे. आता गायकवाड पिता-पुत्राविरुद्ध चतुशृंगी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड पिता-पुत्रावर सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालवडकर यांचे बुलेटचे शोरूम आहे. त्यांनी 2016 साली व्यवसायासाठी 2 कोटी रुपये दोन टक्के व्याजाने घेतले होते. तर, 2018 साली आणखी 55 लाख रुपये चार टक्के व्याजाने घेतले. आरोपींनी पैसे परत न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानुसार, आरोपींचा मित्र धनेश माळी यांच्या खात्यावर 1 कोटी 10 लाख आणि घरी जाऊन तीन कोटी 40 लाख रुपये रोख स्वरूपात दिले. तसेच आरोपींनी त्यांची आठ गुंठे जमीन लिहून घेतली. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत.

 

दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Police) गायकवाड पिता-पुत्रांचा आणि त्यांच्या साथिदारांचा सराईत गुन्हेगारामध्ये समावेश करुन त्यांच्यावर मोक्का कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांनी गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड, नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आय.टी.आय रोड, औंध), गणेश ज्ञानेश्वर साठे (वय-3 रा. हनुमान मंदिरासमोर, पिंपळे निलख), राजु दादा अंकुश (रा. श्रावणी बिल्डींग, फ्लॅट नं. गल्ली नं. 1 पिंपळे गुरव), दिपक गवारे (रा. जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे) यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Another crime registered on businessman Nanasaheb Gaikwad and ganesh gaikwad

 

हे देखील वाचा :

Pimpri Crime | ‘माझ्या विरोधात तू कुठंही तक्रार केली तर… ‘ 26 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

Maharashtra Mantralaya | धक्कादायक ! मंत्रालयाच्या उपहारगृह परिसरात आढळल्या दारुच्या बाटल्या; खमंग चर्चेला उधाण

Pimpri Crime | भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच लगावली कानाखाली, एकाला अटक

 

Related Posts