IMPIMP

Pimpri Crime | भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच लगावली कानाखाली, एकाला अटक

by nagesh
Pune Crime | In Pune, the mother in law asked the bride to wear shorts and said 'I want to see you'

पिंपरी (Pimpri): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  Pimpri Crime | भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करुन मारहाण (Beating Police) केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी (Pimpri News) मध्ये घडला आहे. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार अथर्व हॉटेल समोर, जुना जकात नाका, मोशी येथे समोवारी (दि.9) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला (Pimpri Crime). याप्रकरणी सुजित चंद्रकांत जाधव (वय-24 रा. हनुमान नगर, भोसरी) याला भोसरी पोलिसांनी (Bhosari Police) अटक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी पोलीस कर्मचारी संजय बाळासाहेब थेटे (Sanjay Thete) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी संजय थेटे हे कर्तव्यावर होते. त्यावेळी अक्षय सोपान हजारे आणि सुजित जाधव व त्यांचे वडील चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव (वय-54) यांच्या भांडण सुरु होते. त्यावेळी कर्तव्यावर असलेले थेटे हे भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी सुजितने मध्यस्थी करणाऱ्या थेटे अंगावरील वर्दीच्या (Uniform) शर्टची कॉलर पकडली.

 

तसेच सुजितने तू आमच्यामध्ये कशाला येतो, असे म्हणत शेटे यांच्या डाव्या गालावर चापट मारुन
(slapped police) धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सुजितवर गुन्हा
दाखल करुन पोलिसांनी सुजित जाधव याला अटक केली आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी
पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत साकोरे (PSI Shrikant Sacore) करीत आहेत.

 

Web Title : Pimpri Crime | The police, who had gone to settle the dispute, were betan, one arrest in this case

 

हे देखील वाचा :

Ujjwala Yojana | उज्ज्वला योजना 2.0 : जाणून घ्या कशी लाभदायक आहे ही सरकारी योजना आणि तुम्ही कसा घेऊ शकता लाभ

Indo-Tibetan Border Police | कडक सॅल्यूट ! उच्चाधिकारी बनलेल्या मुलीला पाहून PI वडिलांनं केला ‘सलाम’

Supreme Court | उमेदवारांची निवड निश्चित झाल्यानंतर 48 तासात गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करा – सुप्रीम कोर्ट

 

Related Posts