IMPIMP

Pune Crime | घरकामाच्या बहाण्याने घरातील दागिन्यांवर डल्ला मारणारे ‘बंटी-बबली’ गुन्हे शाखेकडून गजाआड, तब्बल 254 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

by nagesh
Pune Crime News | Accused who threatened to kill family of chartered accountant and demanded extortion of 30 lakhs arrested by crime branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | घरकाम करण्याच्या बहाण्याने घरातील सोन्याच्या दागिन्यांवर (Gold Jewellery) डल्ला मारणाऱ्या आणि चोरलेले (Stolen) सोन्याचे दागिने गहाण ठेऊन पैसे घेणाऱ्या बंटी-बबलीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Crime Branch Unit Two) पथकाने सापळा रचून अटक (Arrest) केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 12 लाख 73 हजार रुपयांचे 254.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रेखा राहुल क्षिरसागर Rekha Rahul Kshirsagar (वय – 30 रा. वानवडीगाव, पुणे), रुषभ विनोद जाधव Rushabh Vinod Jadhav (रा. रामटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची (Pune Crime) नावे आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी टीम तयार करुन आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाकडून आरोपींचा शोध सुरु असताना पथकाला या गुन्ह्यातील आरोपी नटराज हॉटेल (Natraj Hotel) जवळील सार्वजनिक रोडवर उभे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. (Pune Crime)

 

आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. आरोपींची पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी रेखा क्षिरसागर ही फिर्यादी यांच्या घरात काम करण्याचा बहाणा करुन घरातील सोन्याचे दागिने चोरून ते रुषभ जाधव याच्याकडे देत होती. रुषभ सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले (API Vaishali Bhosle), विशाल मोहिते (API Vishal Mohite)
पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble), राजेंद्र पाटोळे (PSI Rajendra Patole)
पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, उत्तम तारु, गजानन सोनुने, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, कादिर शेख, समीर पटेल, संजय जाधव, निखील जाधव, विजयकुमार पवार, प्रमोद कोकणे, शंकर नेवसे, राहुल राजपुरे, मोसीन शेख, गणेश थोरात, नागनाथ राख यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : – Pune Crime | As many as 254 grams of gold ornaments have been seized by the Bunty-Babli crime branch who used to steal household ornaments on the pretext of housework

 

हे देखील वाचा :

Ovarian Cancer | महिलांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसली तर असू शकतो ओव्हरी कॅन्सर, जाणून घ्या सविस्तर

Shivsena | ‘तुम्ही पाठित खंजीर खुपसला, आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नका’; शिवसेना महिला नेत्याचा आदित्य ठाकरेंवर घणाघात (व्हिडिओ)

Hypertension | विना औषध हाय ब्लड प्रेशर कसे करावे कंट्रोल, जाणून घ्या

 

Related Posts