IMPIMP

Pune Crime | … म्हणून दुकानमालकाच्या डोक्यात हातोड्याने केली मारहाण; विश्रांतवाडीतील टिंगरेनगर रोडवरील घटना

by nagesh
Pune Crime | From the old controversy, he sent obscene messages in the name of the woman and slandered her for having links with terrorists

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | फटाके रस्त्यावर लावून तो पायाने ढकल्याने दुकान मालकाच्या पायाजवळ जाऊन फुटला़ त्यामुळे मालक ओरडल्याने त्याचा राग धरुन टोळक्याने हातोडा, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले़ तसेच इतर कामगारांना शिवीगाळ करुन दहशत (Pune Crime) माजविण्याचा प्रकार विश्रांतवाडीतील (Vishrantwadi) टिंगरेनगर रोडवर (Tingre Nagar Road) गुरुवारी रात्री ९ वाजता घडला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

शिवाजी पाटील (रा़ टिंगरेनगर) हे प्रकारात गंभीर जखमी झाले आहेत़ उस्मान अब्दुल खान (वय ४३, रा़ येरवडा)
यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यावरुन निहाल सुनिल सरोदे (वय २६), विनोद राजू जमखंडे ऊर्फ गोट्या (वय २२),
अमोल तात्या चव्हाण (वय २४, सर्व रा. श्रमिक वसाहत, टिंगरेनगर) या तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी निकेश साळवे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

निलेश साळवे याने रस्त्यावर फटाके लावून तो पायाने शिवाजी पाटील यांच्याकडे ढकलला. तो फटाका पाटील यांच्या पायाजवळ जाऊन फुटला.
त्यामुळे पाटील हे ओरडले. त्याचा राग मनात धरुन चौघांनी लोखंडी हातोड्याने व दगडाने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
इतर कामगारांना शिवीगाळ करुन धमकी देऊन दहशत माजविली.
विश्रांतवाडी पोलिसांनी चौघांवर खूनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचा गुन्हा दखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेख तपास करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : pune crime | attempt to murder in vishrantwadi area of tingrenagar road

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हॉटेल व्यावसायिकाला 2 लाखांची खंडणी मागणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | तडीपार गुंडाला गुंडाविरोधी पथकाने केलं अटक

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! पीएम किसानच्या 10 व्या हप्त्यासाठी ‘हे’ कार्ड आवश्यक, अन्यथा अकाऊंटमध्ये येणार नाहीत पैसे

 

Related Posts